शहरं
Join us  
Trending Stories
1
वडील नव्हे तर आईच्या जातीच्या आधारे मुलीला मिळणार SC प्रमाणपत्र; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
2
विधानपरिषद सभापती-सदस्यांचा अपमान करणाऱ्या सूर्यकांत मोरेंविरोधात हक्कभंग
3
"सध्या तर सरकारं उद्योगशरण, विमान कंपनीच्या..."; राज ठाकरेंची बाबा आढावांसाठी भावूक पोस्ट, केंद्र सरकारला सुनावले
4
फुके, टिळेकरांनी पासेस नसताना अभ्यागतांना आणलेच कसे? विधानपरिषद सभापतींसमोर सभागृहात दोघांनाही समज
5
Dhule: कांदा भरताना विपरीत घडलं, ट्रक्टरसह ३ चिमुकल्या विहिरीत बुडाल्या, आई-वडिलांचा टाहो!
6
UPI वापरकर्त्यांसाठी मोठी ऑफर! BHIM ॲप देणार १००% कॅशबॅक; मिळवण्यासाठी फॉलो करा 'हे' सोपे नियम
7
अरेरे! १५ मिनिटं लवकर ऑफिसमध्ये पोहचल्यामुळे तरुणीने गमावली नोकरी, नेमकं काय घडलं?
8
Phaltan Doctor Death: "...म्हणून त्या दोघांची नावे लिहून तिने मृत्युला मिठी मारली"; CM फडणवीसांनी विधानसभेत सगळं प्रकरण सांगितलं
9
IND vs SA 1st T20I Live Streaming : भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात टी-२० चा थरार! सामना कुठे आणि कसा पाहाल?
10
"वेगळा विदर्भ हा भाजपाचा अजेंडा"; मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या विधानाने वाद, शिवसेना आक्रमक
11
Viral Video : डोक्यावर सिलेंडर अन् खांद्यावर बॅग... 'ती'चे कष्ट पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी!
12
'मॅडम, तुमच्या भावाला गांजाच्या तस्करीत पकडलंय?' पत्रकारांच्या प्रश्नाने भाजपाच्या महिला मंत्री संतापल्या
13
"मला माझा वाटा हवा", नवऱ्याला जमिनीचे ४६ लाख मिळताच परतली बॉयफ्रेंडसोबत पळालेली बायको
14
IndiGo नं केले ८२७ कोटी रिफंड, पाहा कसं चेक करायचं Refund Status?
15
पती मेहुणीच्या प्रेमात पडला; आधी पत्नीचा मोठ्या रकमेचा विमा काढला अन्... ऐकून होईल संताप!
16
Winter Special: गाजर कोफ्ता खाल्लाय? या हिवाळ्यात ट्राय करा दाटसर ग्रेव्ही असलेली रुचकर कोफ्ता करी 
17
तुमची फ्लाईट लेट किंवा कॅन्सल झाली? मग तुम्हाला 'इतका' मोबदला मिळणे बंधनकारक! काय आहेत नवीन नियम?
18
"रायगडचं चॅलेंज छ.संभाजीनगरवाल्यांनी स्वीकारावं" दानवेंच्या 'कॅश बॉम्ब'वर गोगावलेंची प्रतिक्रिया
19
भारतीय रुपयाची होणारी घसरण चांगली बातमी आहे का? पाहा कोणाला होणार फायदा
Daily Top 2Weekly Top 5

‘एक्झिट पोल’चे अंदाज ठरले सपशेल फाेल; फक्त तेलंगणामध्ये जुळले आकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2023 07:25 IST

मात्र इतर तीन राज्यांतील निकालांचा अंदाज लागला नाही

मनाेज रमेश जाेशी

नवी दिल्ली : पाचपैकी चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर एक्झिट पाेलच्या विश्वासार्हतेवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. 

बहुतांश पाेल्सनी मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये भाजप काठावर पास हाेईल तर छत्तीसगड व तेलंगणामध्ये काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळणार, असे म्हटले हाेते. राजस्थान व मध्य प्रदेशात भाजप-काँग्रेसमध्ये कडवी झुंज हाेईल, असे चित्र हाेते. मात्र, तेलंगणाचा अपवाद वगळता ३ राज्यांमध्ये एक्झिट पाेलचे अंदाज पार फाेल ठरले आहेत. 

मध्य प्रदेशमध्य प्रदेशमध्ये भाजपला सरासरी १०० ते ११५, तर काँग्रेसलाही त्याच प्रमाणात जागा मिळतील असे एक्झिट पाेलमध्ये म्हटले हाेते. केवळ ‘ॲक्सिस माय इंडिया’ आणि ‘टुडेज चाणक्य’ या संस्थांनी भाजपला १४० ते १६३ जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त केला हाेता. प्रत्यक्षात भाजप १६० पेक्षा जास्त जागा जिंकून पुन्हा सत्तेवर आला. हे वगळता इतरांचे अंदाज चुकीचे ठरले.

राजस्थानबहुतांश एक्झिट पाेलमध्ये भाजप आणि काँग्रेसला सरासरी ९० ते ११० जागा मिळतील, असे म्हटले हाेते. ‘जन की बात’, ‘मॅट्रिझ’ आणि ‘ईटीजी’ यांनी भाजपला बहुमत मिळेल. १०० ते ११८ सरासरी जागा मिळतील, असा अंदाज मांडला हाेता. प्रत्यक्षात भाजपने ११० पेक्षा जास्त जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे वरील तीन वगळता इतरांचे अंदाज चुकलेले दिसतात.

छत्तीसगडकाँग्रेसला एक वगळता सर्व एक्झिट पाेलमध्ये सरासरी ४५ ते ५० जागा मिळतील, असे म्हटले हाेते. केवळ ‘जन की बात’ने भाजपला ४२ ते ५३ जागा देऊ केल्या हाेत्या. प्रत्यक्षात भाजपला ५० पेक्षा जास्त जागांवर विजय मिळाला आहे. त्यामुळे इतर सर्व एक्झिट पाेलचे अंदाज फाेल ठरले आहेत.

तेलंगणा‘पाेलस्ट्रॅट’ वगळता सर्वच एक्झिट पाेलमध्ये काँग्रेसचे सरकार येणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला हाेता. पाेलट्रॅटने काँग्रेस आणि बीआरएसला ४८ ते ५७ जाग मिळतील, असे म्हटले हाेते. प्रत्यक्षात काँग्रेस पक्ष ६० पेक्षा जास्त जागा जिंकून पुन्हा सत्तेवर आला आहे. बीआरएसचे सरकार जाणार, हा एक्झिट पाेलचा अंदाज या राज्यात खरा ठरला.

टॅग्स :ElectionनिवडणूकMadhya Pradesh Assembly Electionमध्यप्रदेश विधानसभा निवडणूक २०२३telangana assembly electionतेलंगणा विधानसभा निवडणूक २०२३Rajasthan Assembly Electionराजस्थान विधानसभा निवडणूक