साहित्याअभावी भज्जीची चव उडणार ककक
By admin | Updated: December 20, 2014 22:27 IST
वलांडी : यंदाच्या दुष्काळी परिस्थितीमुळे भाजीपाल्याचे उत्पादन घटले आहे़ त्यातच काही भाज्या उपलब्ध नाहीत़ परिणामी, वेळा अमावस्येच्या सणासाठीची भज्जी यंदा बेचव होण्याची शक्यता गृहिणींकडून व्यक्त होत आहे़
साहित्याअभावी भज्जीची चव उडणार ककक
वलांडी : यंदाच्या दुष्काळी परिस्थितीमुळे भाजीपाल्याचे उत्पादन घटले आहे़ त्यातच काही भाज्या उपलब्ध नाहीत़ परिणामी, वेळा अमावस्येच्या सणासाठीची भज्जी यंदा बेचव होण्याची शक्यता गृहिणींकडून व्यक्त होत आहे़परंपरेनुसार शेतकरी वेळा अमावस्येदिवशी आपल्या शेतातील लक्ष्मीची मनोभावे पूजा करतात़ ज्वारी, हरभरा, गहू, करडा, तूर या पिकांनी शेती फुलेली असते़ ताज्या भाज्या, हरभरा, बटाणा मिश्रित भज्जी तयार केली जाते़ या भज्जीचा आस्वाद घेण्यासाठी आप्तेष्ठांसह मित्र परिवाराला आग्रहाचे निमंत्रण दिले जाते़ परंतु, यावर्षी पाऊस नसल्याने शिवारं उजाड व काळाभोर दिसत आहेत़