पेन्शनधारकांच्या मागण्यांवर चर्चा
By admin | Updated: February 18, 2015 00:13 IST
राहाता : सेवानिवृत्त कामगारांना किमान सात हजार रुपये पेन्शन मिळावी यासह इतर मागण्यांसाठी निवृत्त कामगारांनी संघटित होऊन लढा उभारावा, असे आवाहन महाराष्ट्र सेवा निवृत्त संघटनेचे सरचिटणीस सुभाष कुलकर्णी यांनी सोमवारी राहाता येथे कामगारांच्या मेळाव्यात केले.
पेन्शनधारकांच्या मागण्यांवर चर्चा
राहाता : सेवानिवृत्त कामगारांना किमान सात हजार रुपये पेन्शन मिळावी यासह इतर मागण्यांसाठी निवृत्त कामगारांनी संघटित होऊन लढा उभारावा, असे आवाहन महाराष्ट्र सेवा निवृत्त संघटनेचे सरचिटणीस सुभाष कुलकर्णी यांनी सोमवारी राहाता येथे कामगारांच्या मेळाव्यात केले. किमान ७ हजार रुपये पेन्शन मिळावी, सरकारी कर्मचार्यांप्रमाणे महागाई भत्ता मिळावा, दर तीन वर्षांनी फेरपडताळणी करावी, पेन्शन योजनेत केंद्र सरकारने सहभाग द्यावा, एप्रिल २०१४ पासून पेन्शन योजनेत वाढ झाली त्याचा फरक अदा करावा, गणेश कारखान्याचे सेवानिवृत्त कर्मचार्यांचे अंतिम पेमेंट मिळावे या मागण्या करण्यात आल्या.यावेळी जी. बी. घोरपडे, जी. बी. कापसे, दहिफळे, अण्णासाहेब तांबे, नारायण होन, शिवाजी जेजूरकर, अनंत पारखे, सोमनाथ कळसकर, पोखरकर, विनायक निकाळे, यंशवत वर्पे, अशोक पवार, सुरेश डांगे यावेळी उपस्थित होते. (वार्ताहर)