डिझेल ५० पैशांनी महागले
By admin | Updated: June 1, 2014 00:32 IST
नवी दिल्ली : डिझेलच्या किमतीत शनिवारी प्रति लिटरमागे ५० पैशांची वाढ करण्यात आली आहे. ही दरवाढ शनिवारच्या मध्यरात्रीपासूनच लागू झाली. डिझेलच्या किमतीत वाढ करण्याची तीन आठवड्यांतील ही दुसरी वेळ आहे.
डिझेल ५० पैशांनी महागले
नवी दिल्ली : डिझेलच्या किमतीत शनिवारी प्रति लिटरमागे ५० पैशांची वाढ करण्यात आली आहे. ही दरवाढ शनिवारच्या मध्यरात्रीपासूनच लागू झाली. डिझेलच्या किमतीत वाढ करण्याची तीन आठवड्यांतील ही दुसरी वेळ आहे.नवे पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी संपुआ सरकारने प्रारंभ केलेल्या सुधार कार्यक्रमांना कायम ठेवताना सरकारी तेल कंपन्यांच्या अधिकार्यांसोबत चर्चा केली आणि त्यानंतर डिझेल दरातील ही मासिक वाढ जाहीर करण्यात आली. जानेवारी २०१३ मध्ये संपुआ सरकारने दर महिन्याला डिझेलच्या किमतीत ५० पैसे वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. डिझेलवरील अनुदान समाप्त होईपर्यंत ही दरवाढ कायम राखण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यापूर्वी १३ मे रोजी डिझेलची दरवाढ करण्यात आली होती. (वृत्तसंस्था)