पिण्याच्या पाण्यासाठी वणवण
By admin | Updated: August 26, 2015 23:32 IST
पुणे : भर पावसाच्या दिवसांत पिके करपू लागल्याने पाण्यासाठी ओरड सुरू असून, पिण्याच्या पाण्यासाठीही जिल्ात पुन्हा ग्रामस्थांची वणवण सुरू झाली आहे. २९ टँकरने १५ गावे व १५९ वाड्यावस्तांवर ५६ हजार ८९१ लोकसंख्येला टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.
पिण्याच्या पाण्यासाठी वणवण
पुणे : भर पावसाच्या दिवसांत पिके करपू लागल्याने पाण्यासाठी ओरड सुरू असून, पिण्याच्या पाण्यासाठीही जिल्ात पुन्हा ग्रामस्थांची वणवण सुरू झाली आहे. २९ टँकरने १५ गावे व १५९ वाड्यावस्तांवर ५६ हजार ८९१ लोकसंख्येला टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.यंदा ५ जूनपासून पावसाचे आगमन झाले. १५ जूनपर्यंत समानाधानकारक व जूनच्या अखेरीस सरासरीच्या १४६ टक्के पाऊस झाला. २५ जूननंतर २0 जुलैपर्यंत पावसाने दडी मारली. २0 जुलैनंतर पावसास सुरुवात होऊन ३१ जुलैपर्यंत महिन्याच्या सरासरीच्या ५२ टक्के पाऊस पडला. पुन्हा ऑगस्ट महिन्यात पावसाने दडी मारली. फक्त २४ टक्के पाऊस पडला. याचा परिणाम पिकांवर झाला असून पिके जळू लागली आहेत. याप्र्रमाणेच पिण्यासाठी पाण्याची टंचाई भासू लागली असून, पावसाळ्याच्या सुरुवातीला टँकर कमी होऊन १९ वर गेले होते. ती संख्या आता २९ झाली आहे. गेल्या महिनाभरात जिल्ात पुन्हा १0 टँकर वाढले आहेत. यावरून पाणीटंचाई किती गंभीर होत आहे हे दिसून येते. शिरूर, दौैंड, इंदापूर व बारामती या तालुक्यांत २५ जूननंतर अद्याप पाऊसच पडला नाही. परिणामी पाण्यासाठी वणवण सुरू झाली आहे. बारामती तालुक्यात सर्वाधिक १0 टँकरने ४ गावे व ७६ वाड्यावस्त्यांवर २१ हजार २६ लोकसंख्येला पाणीपुरवठा सुरू आहे. हे टँकर गेल्या महिनाभरापासून सुरू आहेत. मात्र, इंदापूर तालुक्यात टँकर गेल्या आठवडाभरात वाढले असून, बारामतीपाठोपाठ ९ टँकरने ५ गावे व १९ वाड्यावस्तांवर १५ हजार २६६ लोकसंख्येला पाणीपुरवठा सुरू आहे. त्यानंतर पुरंदर तालुक्यात ५ टँकरने १ गाव ५१ वाड्यावस्तांवर १0 हजार ७११ लोकसंख्येला टँकर पाणी पुरवत आहेत. आंबेगाव तालुक्यात २ तर दौैंड, हवेली, पुरंदर, शिरूर तालुक्यात प्रत्येकी १ टँकर सुरू आहे. टँकरची मागणी करून टँकर मिळत नसल्याची जिल्ात ओरड आहे. जर मागणीप्रमाणे टँकर मिळाले असते तर पाणीटंचाई किती गंभीर आहे, हे समोर आले असते. जिल्ाधिकार्यांनी प्रस्ताव द्या चार तासांत मंजूर करू, असे नुकतेच आश्वासन दिले आहे. त्यानुसार पावसाची स्थिती अशीच राहिली तर टँकरची संख्या मोठ्या प्रमाणात वाढविण्याची शक्यता आहे.