किमान दोन सरचिटणीसांना हटवा- दुर्रानी यांची मागणी काँग्रेसमध्ये मतभेद : संघटनात्मक बदलाच्या मागणीला जोर
By admin | Updated: February 16, 2015 21:12 IST
नबीन सिन्हा/ नवी दिल्ली : काँग्रेसमध्ये आता उघड उघड तलवारबाजी सुरू झाली आहे. दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित आणि त्यांचे पुत्र संदीप यांनी गेल्या आठवड्यात काँग्रेसमधील संघर्ष जाहीररीत्या चव्हाट्यावर आणला होता. आता माजी सरचिटणीस अनिस दुर्रानी यांनी किमान दोन सरचिटणीसांना हटवा, अशी मागणी करीत अंतर्गत संघर्षात भर घातली आहे.
किमान दोन सरचिटणीसांना हटवा- दुर्रानी यांची मागणी काँग्रेसमध्ये मतभेद : संघटनात्मक बदलाच्या मागणीला जोर
नबीन सिन्हा/ नवी दिल्ली : काँग्रेसमध्ये आता उघड उघड तलवारबाजी सुरू झाली आहे. दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित आणि त्यांचे पुत्र संदीप यांनी गेल्या आठवड्यात काँग्रेसमधील संघर्ष जाहीररीत्या चव्हाट्यावर आणला होता. आता माजी सरचिटणीस अनिस दुर्रानी यांनी किमान दोन सरचिटणीसांना हटवा, अशी मागणी करीत अंतर्गत संघर्षात भर घातली आहे.अलीकडील निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या पराभवाला जबाबदार असलेल्या किमान दोन सरचिटणीसांना हटविण्याची मागणी करताना त्यांनी जनार्दन द्विवेदी आणि मधुसुदन मिस्त्री यांना लक्ष्य बनविले. मे २०१४ मध्ये पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुका आणि नुकत्याच झालेल्या दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीसाठी हे दोघे जबाबदार असल्याचे त्यांनी पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे. पक्षाच्या पराभवाबद्दल केवळ प्रदेश नेत्यांनाच जबाबदार धरले जात असून त्यांची उचलबांगडी केली जाते, दुसरीकडे सरचिटणीसांना किरकोळ बदल करीत कायम ठेवले जाते, याकडे त्यांनी लक्ष वेधले.------------------काय म्हणाले होते द्विवेदी?लोकसभेच्या निवडणुकीआधी जनार्दन द्विवेदी यांनी अनुसूचित जाती-जमाती आणि अन्य घटकांच्या नोकरीतील आरक्षणाबाबत फेरविचार करण्याची मागणी केली होती, त्यामुळे काँग्रेसच्या व्होटबँकेला हादरा बसला. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भारतीयत्वाचे प्रतीक असे संबोधत मुक्तकंठाने स्तुती केली होती. त्यामुळे दिल्लीतील पारंपरिक मतदारांवर प्रभाव पडला, असेही दुर्रानींनी पत्रात म्हटले. द्विवेदी यांनी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्या नेतृत्वक्षमतेबाबत बेजबाबदार तुलनात्मक विधाने करीत काँग्रेसनिष्ठ कार्यकर्त्यांना चुकीचा संदेश दिल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले.-------------------उपोषणाला बसणारया दोन नेत्यांना हटविले जात नाही तोपर्यंत काँग्रेसच्या मुख्यालयासमोर उपोषणाची परवानगी द्यावी. काँग्रेसचे दुसरे सरचिटणीस मधुसुदन मिस्त्री यांनी उत्तर प्रदेशातील सच्च्या काँग्रेस कार्यकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेतले नाही. त्यांचा राजकारणाशी संबंध नसल्यामुळे पक्षाची स्थिती आणखी खालावत गेली, या शब्दांत दुर्रानी यांनी तोफ डागली.