निधन वार्ता
By admin | Updated: December 21, 2014 23:49 IST
चंद्रकला पवार
निधन वार्ता
चंद्रकला पवारराहुरी : फोटो आहेराहुरी येथील चंद्रकला प्रभाकर पवार (वय ६८) यांचे ह्रदयविकाराने निधन झाले़ पवार यांच्यामागे दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे़ राहुरी सोसायटीचे अध्यक्ष दिनकर पवार यांच्या त्या मातोश्री होत़तुकाराम मोरे राहुरी : टाकळीमिया येथील तुकाराम कृष्णाजी मोरे (वय ८०) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले़ मोरे यांच्यामागे दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे़ माजी सरपंच बापूसाहेब मोरे यांचे ते वडील होत़राहुरी : देवळाली प्रवरा येथील पार्वतीबाई निवृत्ती कदम (वय ८५) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले़ कदम यांच्यामागे सहा मुली, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे़ चंद्रभान बर्डेराहुरी : आरडगाव येथील चंद्रभान जयवंत बर्डे (वय ६०) यांचे हदयविकाराने निधन झाले़ बर्डे यांच्यामागे दोन मुली, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे़उमाजी मंडलिक (फोटो- २१मंडलिक)अकोले : माळीझाप येथील प्रगतशिल शेतकरी उमाजी केरू मंडलिक (वय ८०) यांचे वृध्दापकाळाने निधन झाले. त्यांचे पश्चात अभिनव शिक्षण संस्थेचे रजिस्ट्रार दिलीप मंडलिक यांच्यासह तीन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.