पिटकेश्वरच्या यात्रेनिमित्त भाविकांची गर्दी
By admin | Updated: August 26, 2015 23:32 IST
निमगाव केतकी : पिटकेश्वर येथील ग्रामस्थांच्या वतीने महादेव मंदिरामध्ये यात्रा उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या उत्सवाच्या निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह कुस्ती आखाडा तसेच विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. या वेळी पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी महादेव मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती.
पिटकेश्वरच्या यात्रेनिमित्त भाविकांची गर्दी
निमगाव केतकी : पिटकेश्वर येथील ग्रामस्थांच्या वतीने महादेव मंदिरामध्ये यात्रा उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या उत्सवाच्या निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह कुस्ती आखाडा तसेच विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. या वेळी पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी महादेव मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती. या ठिकाणी असलेल्या महादेव मंदिरामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून श्रावणातील दुसर्या सोमवारी यात्रा भरवली जाते. या यात्रेच्या निमित्ताने विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्याची प्रथा आहे. आज या ठिकाणी यात्रेच्या आठवडाभर अगोदर अखंड हरिनाम सप्ताह व हरिजागर असा कार्यक्रम राबवला जातो. यामध्ये वेगवेगळ्या गावांतील भजनी मंडळाचे भजन व नावलौकिक असलेल्या कीर्तनकारांचे कीर्तनाचे कार्यक्रम सादर केले जातात. प्रवचन, भारूड यांसारख्या कार्यक्रमांचाही सहभाग असतो. यात्रा उत्सवाच्या निमित्ताने कुस्तीचा आखाडा भरवला जातो. या वर्षी लहान-मोठ्या कुस्त्या लावल्या गेल्या. यामध्ये कुस्ती खेळाला प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने येथील सामाजिक कार्यकर्ते प्रवीण एकनाथ भिसे यांच्याकडून ३१ हजार १११ रुपयांची कुस्ती लावण्यात आली. या वेळी जवळपास २०० कुस्त्या लवण्यात आल्या. या वेळी इंदापूर तालुक्यातील कुस्तीप्रेमींनी कुस्तीचा खेळ पाहण्यासाठी हजेरी लावली. फोटो ओळी : पिटकेश्वरच्या यात्रेनिमित्त भरविण्यात आलेला कुस्ती आखाडा. २६०८२०१५-बारामती-२३फोटो ओळी : पिटकेश्वर येथील महादेव मंदिर. २६०८२०१५-बारामती-२४