्रपोलीस उपनिरीक्षक मारहाण प्रकरणी दहा जणांवर गुन्हा
By admin | Updated: May 8, 2014 20:53 IST
नाशिक : सरकारवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सचिन सावंत यांना न्यायालय आवारात मारहाण करून त्यांचे रिवॉल्व्हर हिसकावण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी सिडकोतील कुप्रसिद्ध टिप्पर गँगचा म्होरक्या समीर पठाण, त्याचे सहकारी व नातेवाईक अशा दहा जणांना सरकारवाडा पोलिसांनी आज ताब्यात घेतले़
्रपोलीस उपनिरीक्षक मारहाण प्रकरणी दहा जणांवर गुन्हा
नाशिक : सरकारवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सचिन सावंत यांना न्यायालय आवारात मारहाण करून त्यांचे रिवॉल्व्हर हिसकावण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी सिडकोतील कुप्रसिद्ध टिप्पर गँगचा म्होरक्या समीर पठाण, त्याचे सहकारी व नातेवाईक अशा दहा जणांना सरकारवाडा पोलिसांनी आज ताब्यात घेतले़ संशयितांपैकी आरोपी समीर नासीर पठाण, नागेश भगवान सोनवणे, नितीन बाळकृष्ण काळे, सुनील भास्कर अनर्थे हे अटकेत असून, सरकारवाडा पोलिसांनी आज रहिसाना नासिर पठाण, हीना नासिर पठाण, अलका भगवान सोनवणे, आशा बाळकृष्ण सोनवणे, बाळकृष्ण विष्णू काळे, भगवान काळे यांना अटक के ली आहे़ अंबडला झालेल्या एक कोटी पाच लाख रुपयांच्या लुटीतील टिप्पर गँगच्या संशयित आरोपींंची बुधवारी मोक्का न्यायालयात तारीख होती़ या सर्वांना मध्यवर्ती कारागृहातून पोलीस उपनिरीक्षक सावंत व सहकार्यांनी दुपारी बारा वाजेच्या सुमारास न्यायालयात आणले होते. न्यायालयीन कामकाज आटोपल्यानंतर मोबाइल घेऊ न दिल्याच्या कारणावरून पोलीस नाईक गुंबाडे व सरकारवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सचिन सावंत यांना संशयितांनी व त्यांच्या नातेवाइकांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली होती, तसेच सावंत यांचे रिव्हॉल्व्हर हिसकावण्याचाही प्रयत्न केला होता़ (प्रतिनिधी)