CoronaVirus Live Updates : बापरे! हैदराबादच्या हुसैन सागरमध्ये आढळले कोरोनाचे जेनेटीक मटेरियल; रिसर्चमधून मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2021 11:00 AM2021-05-15T11:00:38+5:302021-05-15T11:04:41+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates : कोरोनामुळे देशात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. अशातच पुन्हा एकदा संशोधनातून धडकी भरवणारी माहिती समोर आली आहे.

CoronaVirus Live Updates Coronavirus genetic material found in Hyderabad's Hussain Sagar, two other lakes | CoronaVirus Live Updates : बापरे! हैदराबादच्या हुसैन सागरमध्ये आढळले कोरोनाचे जेनेटीक मटेरियल; रिसर्चमधून मोठा खुलासा

CoronaVirus Live Updates : बापरे! हैदराबादच्या हुसैन सागरमध्ये आढळले कोरोनाचे जेनेटीक मटेरियल; रिसर्चमधून मोठा खुलासा

Next

नवी दिल्ली - देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा 2,43,72,907 वर पोहोचला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 3,26,098 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 3,890 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 2,66,207 लोकांना जीव गमवावा लागला आहे. कोरोनामुळे देशात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. अशातच पुन्हा एकदा संशोधनातून धडकी भरवणारी माहिती समोर आली आहे. हैदराबादमधील हुसैन सागरसह (Hyderabad Hussainsagar Lake ) इतर काही तलावांमध्ये कोरोना व्हायरसचे जेनेटिक मटेरियल आढळून आले आहे. 

रिसर्चमधून कोरोना व्हायरसचे जेनेटिक मटेरियलबाबत माहिती मिळाली आहे. मात्र याद्वारे संसर्ग पुढे वाढलेला नाही, असंही अभ्यासात स्पष्ट करण्यात आलं आहे. हुसैन सागर तलावाशिवाय नाचारममधील पेद्दा चेरूवु आणि निजाम तलावातही कोरोना व्हायरसचे जेनेटीक मटेरियल आढळले आहे. तलावांच्या पाण्यात असेलेले कोरोनाचे हे जेनेटीक मटेरियअल या वर्षी फेब्रुवारीपासून वाढण्यास सुरू झाले आहे. तेव्हापासूनच देशात कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली असल्याचं रिसर्चमध्ये म्हटलं आहे. 

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, सेंटर फॉर सेल्युलर अँड मॉलिक्युलर बायोलॉजी आणि अकॅडमी ऑफ सायंटिफ्कि अँड इनोव्हेटिव रिसर्च या संस्थांनी मिळून हा रिसर्च केला आहे. त्यामध्ये हैदराबादमधील हुसैन सागरसह इतर काही तलावांमध्ये कोरोना व्हायरसचे जेनेटिक मटेरियल आढळून आल्याची माहिती समोर आली आहे. 7 महिन्यांत केलेल्या रिसर्चमध्ये कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेचा अभ्यास करण्यात आला आहे. तसेच शहरांमधून जे प्रक्रिया न केलेले सांडपाणी आणि प्रदुषित पाणी वाहून आले आहे त्यातूनच कोरोना व्हायरचे जेनेटिक मटेरियल तलावांमध्ये पसरले आहे. पण या जेनेटिक मटेरियलने पुढे प्रादुर्भाव वाढला नसल्याचं म्हटलं आहे. 

देशात सुरू असलेली कोरोनाची दुसरी लाट आणि येणाऱ्या लाटेचा अंदाजाकरता अभ्यासासाठी याचा उपयोग केला जाऊ शकतो. तसेच जगातील इतर देशांमध्येही अनेक ठिकाणी याबाबत अभ्यास सुरू आहे आणि करण्यात येत आहेत. यात पाण्यात व्हायरस आहे की नाही? याचा तपास करण्याच्या प्रयत्न केला गेला. पण पाण्यात आतापर्यंत जे जेनेटीक मटेरियल आढळले आहे तो व्हायरस नाही. संसर्ग वाढण्याची शक्यता कमी आहे, असं सेंटर फॉर सेल्युलर अँड मॉलिक्युलर बायोलॉजीच्या संचालकांनी सांगितलं होतं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

Web Title: CoronaVirus Live Updates Coronavirus genetic material found in Hyderabad's Hussain Sagar, two other lakes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.