शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

CoronaVirus : हळू-हळू विक्राळ रूप धारण करतोय कोरोनाचा डेल्टा व्हेरिएंट, WHO नं दिला गंभीर इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2021 15:05 IST

Covid 19 Delta Plus Variant: गेल्या आठवड्यात म्हणजेच 14 जून ते 20 जूनदरम्यान कोरोनाचे सर्वाधिक 4,41,976 रुग्ण भारतातच समोर आले आहेत.

नवी दिल्ली - सध्या आहे तशीच स्थिती राहिल्यास येणाऱ्या काळात कोरोनाचा सर्वाधिक संक्रमक प्रकार डेल्टा इतर स्वरुपांच्या तुलनेत अधिक गंभीर होऊ शकतो. असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) दिला आहे. जगातील एकूण 85 देशांत हा व्हेरिएंट आढळल्याची पुष्टी झाल्यानंतर, डब्ल्यूएचओने हा इशारा दिला आहे. (CoronaVirus is expected to dominate the delta form cases reported in 85 countries)

डब्ल्यूएचओकडून 22 जूनला जारी करण्यात आलेल्या कोविड-19 साप्ताहिक महामारी विज्ञान अपडेटमध्ये म्हणण्यात आले आहे, की जागतिक स्थरावर, अल्फा स्वरूप 170 देशांत अथवा भागांत आढळून आले आहे. बीटा स्वरूप 119 देशांत, गॅमा स्वरूप 71 देशांत तर डेल्टा स्वरूप 85 देशांत आढलून आले आहे.

जगभरात एकूण 85 देशांत आढळला डेल्टा -अपडेटमध्ये सांगण्यात आले आहे, की “जगभरात डेल्टा एकूण 85 देशांत आढळून आला आहे. डब्ल्यूएचओ अंतर्गत सर्वच भागांतील इतर देशांतही याचे रुग्ण आढळून येत आहेत. यासंदर्भात बोलताना डब्ल्यूएचओने म्हटले आहे, की सध्याचे चार चिंताजनक व्हेरिएंट, अल्फा, बीटा, गॅमा आणि डेल्टा, यांच्यावर लक्ष आहे. जे सर्वाधिक पसरले आहेत. तसेच डब्ल्यूएचओ अंतर्गत येणाऱ्या सर्वच भागांत ते आढळून आले आहेत. “डेल्टा स्वरूप हे अल्फा स्वरूपाच्या तुलनेत फार मोठ्या प्रमाणावर संक्रामक आहे आणि सध्याची परिस्थिती अशीच राहिली तर तो अधिक संक्रमक होण्याचीही शक्यता आहे,’’ असेही डब्ल्यूएचओने म्हटले आहे.

Chinese Corona Vaccine: 'या' देशांना महागात पडला चिनी कोरोना लशीचा वापर! आता पाकिस्तान-नेपाळचं काय होणार?

गेल्या आठवड्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण भारतात -अपडेटनुसार, गेल्या आठवड्यात म्हणजेच 14 जून ते 20 जूनदरम्यान कोरोनाचे सर्वाधिक 4,41,976 रुग्ण भारतातच समोर आले आहेत. हे यापूर्वीच्या आठवड्याचा विचार करता, 30 टक्क्यांने कमी आहेत. याशिवाय सर्वाधिक मृत्यूही भारतातच झाले आहेत.  (16,329 लोकांचा मृत्यू, प्रति एक लाखावर 1.2 लोकांचा मृत्यू, 31 टक्क्यांची घट). आग्नेय आशियात जवळपास 6,00,000 नवे रुग्ण समोर आले आहेत. तर 19,000 लोकांचा मृत्यू झाला आहे. हे प्रमाण गेल्या आठवड्याच्या तुलनेत क्रमश: 21 आणि 26 टक्क्यांनी कमी आहे.

कोरोनाच्या डेल्टा आणि अल्फा व्हेरिएंटविरोधात लशींचा प्रभाव -लशीचा दुसरा डोस घेतल्यानंतर 14 दिवसांनी डेल्टा आणि अल्फा व्हेरिएंटमुळे रुग्णालयात दाखल होण्याची वेळ येऊ नये म्हणून फायझर आणि बायोएनटेक कोमिरनेटीची प्रभाव क्षमता प्रत्येकी 96 तथा 95 टक्के आहे. एस्ट्राजेनेका आणि व्हॅक्सजेव्हरियाची क्रमश: 92 टक्के आणि 86 टक्के एवढी आहे. लशीचा पहिला डोस घेतल्यानंतर 21 दिवसांनंतरही या लशींची प्रभाव क्षमता डेल्टा तथा अल्फा व्हेरिएन्ट विरोधातील 94 टक्के तथा 83 टक्के दिसून आली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसdoctorडॉक्टरWorld health organisationजागतिक आरोग्य संघटना