नवी दिल्ली : आर्थिक आणि व्यापार क्षेत्रत सहकार्याचे नवे पर्व सुरू करताना येत्या पाच वर्षात भारतात 2क् अब्ज अमेरिकी डॉलरची गुंतवणूक करण्याचा वायदा चीनने केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जीनपिंग यांनी विस्तृत चर्चेअंती विविध क्षेत्रतील 12 करारांवर स्वाक्षरी केली. या करारांमुळे भारतात होणा:या मोठय़ा गुंतवणुकीमुळे संतुलित आणि सातत्यपूर्ण आर्थिक संबंधाचा ‘रोडमॅप ’निश्चित झाल्याचे मानले जाते.
उभय देशांमध्ये गुरुवारी झालेल्या करारांमुळे भारतातील रेल्वेचा विकास, चित्रपटांची संयुक्त निर्मिती, कस्टम प्रशासनातील सहकार्य, अंतराळ संशोधन व उपग्रहांचा विकास, पारंपरिक औषधांची चाचणी, सांस्कृतिक सहकार्य आणि मानसरोवरची यात्र सुखकर करण्याच्या विषयांचा समावेश आहे.
भारतातील रेल्वेचे जाळे बळकट करण्यासाठी चीनने मदत देऊ केली आहे. रेल्वेचा वेग वाढविण्यासह हायस्पीड रेल्वे निर्मितीत सहकार्याची शक्यता पडताळणो, रेल्वेस्थानकांचा पुनर्विकास आदी मुद्यांचा त्यात सहभाग आहे. त्याखेरीज सीमेपलीकडील आर्थिक आणि कस्टम संबंधी गुनंना आळा घालण्यासाठी माहितीच्या आदान- प्रदानावर भर दिला जाईल.
सध्या उत्तराखंडमधील लिपुलेख या मार्गाने कैलास मानसरोवर यात्र पार पाडली जाते. ती अतिशय खडतर ठरते.यापुढे सिक्कीममधील नाथुला खिंडीतून समोर जाता येईल. त्यामुळे ही यात्र सुखकर आणि कमी वेळेत होणार असून वृद्ध यात्रेकरूंना त्याचा लाभ होईल. मानसरोवर यात्रेसंबंधी सामंजस्य करारावर विदेश मंत्री सुषमा स्वराज आणि चीनचे विदेश मंत्री वांग यी यांनी स्वाक्षरी केली.
माहिती व प्रसारण मंत्रलय तसेच चीनच्या प्रसिद्धी माध्यम प्रशासनाने दृकश्रव्य सहनिर्मितीसंबंधी केलेल्या करारामुळे दोन्ही देशांच्या निर्मात्यांना सृजनात्मक, कलात्मक, तांत्रिक सहकार्याचे बंध बळकट करीत चित्रपटांची संयुक्त निर्मिती करणो शक्य होईल. भारतीय अंतराळ संशोधन संघटना (इस्ने) आणि चीनच्या राष्ट्रीय अंतराळ प्रशासन संस्थेने अंतराळ संशोधनाच्या शांततापूर्ण वापरासाठी वैज्ञानिक प्रयोगांसह, सुदूरसंवेदी उपग्रहाचा विकास आणि संशोधनात उभयपक्षी सहकार्य देण्याचे मान्य केले आहे. त्याखेरीज, औषध मानक ठरविणो, पारंपरिक औषधांची चाचणीसंबंधी करारामुळे औषध क्षेत्रत नवा अध्याय सुरू होईल. मुंबई- शांघाय यांचे संबंध भगिनी-शहरांसारखे राहणार असून दोन देशांमधील सहकार्य वाढविणो शक्य होईल. (लोकमत न्यूज नेटवर्क)
च्चीन हा भारताचा सर्वात मोठा शेजारी असून परस्परांच्या शांतता आणि स्थैर्यासाठी संवदेनशील अशा मुद्यांचा आम्हाला आदर आहे, असे मोदी म्हणाले. त्यांनी चीनच्या घुसखोरीसह चीन व्हीसा, सीमेपलीकडील नद्यांचा मुद्दाही उपस्थित केला. या प्रश्नांवर लवकर तोडगा निघेल आणि परस्पर विश्वासाच्या वातावरणाला नवी उंची लाभेल. नागरी अणु ऊज्रेच्या मुद्यावर आम्ही चर्चा सुरू करणार असून त्यामुळे ऊर्जा सुरक्षेवर व्यापक सहकार्याला बळकटी मिळेल, असा विश्वासही मोदींनी व्यक्त केला.
च्भारत-चीनचे आर्थिक संबंध क्षमतेला न्याय देणारे नाहीत. व्यापार घटल्याने संतुलन बिघडले आहे. बाजारपेठांमधील प्रवेशाला बळकटी देण्यासाठी संबंध सुधारायला हवे. चीनमध्ये भारतीय कंपन्यांना गुंतवणुकीला संधी दिली जावी.
च्जपानने पुढील पाच वर्षात 35 अब्ज अमेरिकन डॉलरच्या गुंतवणुकीचे आश्वासन दिले. चीनकडून होणारी गुंतवणूक कितीतरी कमी आहे. दोन देशांमधील जनतेमध्ये संवाद वाढविण्याची गरज. 2क्15 व्हिजिट इंडिया इयर तर 2क्16 व्हिजिट चायना वर्ष साजरा करण्याला दोन देश सहमत.