पढेगाव शाळेत मुलांना पुरस्कार
By admin | Updated: February 14, 2015 23:52 IST
श्रीरामपूर : पढेगाव जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक शकील बागवान यांनी १५ वर्षानंतर प्रथमच मुले व मुलांच्या शाळेचे संयुक्त स्नेहसंमेलन घेतले. यानिमित्त मुलांना आदर्श पुरस्काराने गौरविण्यात आले.
पढेगाव शाळेत मुलांना पुरस्कार
श्रीरामपूर : पढेगाव जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक शकील बागवान यांनी १५ वर्षानंतर प्रथमच मुले व मुलांच्या शाळेचे संयुक्त स्नेहसंमेलन घेतले. यानिमित्त मुलांना आदर्श पुरस्काराने गौरविण्यात आले. कर्नालचे रामदास महाराज, सरपंच किशोर बनकर, शिक्षण विस्ताराधिकारी दीपक त्रिभुवन, केंद्रप्रमुख ज्योती परदेशी, मुख्याध्यापिका दुर्गा गुंड, योगदान मंडळाचे अध्यक्ष दत्तात्रय बनकर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बापूसाहेब तोरणे, दीपक राजबन्शी, बबनराव कांदळकर यांच्याहस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. उत्तम गुणांची जोपासना करणारे सार्थक बनकर व वृषाली पवार यांना महात्मा फुले व सावित्रीबाई आदर्श विद्यार्थी पुरस्कार देण्यात आले. जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत सहभागी होणारा अवधूत बनकर तसेच राज्य पुरस्कारप्राप्त मीना जाधव-गिरमे यांनाही मंडळातर्फे गौरविण्यात आले. शकील बागवान यांनी सूत्रसंचालन केले. रेश्मा तोरणे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)