नाताळाचा उत्साह शिगेला़़़़धार्मिक, सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन
By admin | Updated: December 21, 2014 23:49 IST
अहमदनगर : ख्रिस्ती बांधवांच्या परमोच्च आदराचे प्रतीक असलेला नाताळ सण अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपला असून, ख्रिस्ती बांधवांच्या उत्साहाला उधाण आले आहे़ शहरातील बाजारपेठांमध्ये ख्रिसमस ट्री, केक आणि डोनट तसेच फराळ आणि कपड्यांच्या खरेदीसाठी उत्साह टिपेला जात आहे़
नाताळाचा उत्साह शिगेला़़़़धार्मिक, सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन
अहमदनगर : ख्रिस्ती बांधवांच्या परमोच्च आदराचे प्रतीक असलेला नाताळ सण अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपला असून, ख्रिस्ती बांधवांच्या उत्साहाला उधाण आले आहे़ शहरातील बाजारपेठांमध्ये ख्रिसमस ट्री, केक आणि डोनट तसेच फराळ आणि कपड्यांच्या खरेदीसाठी उत्साह टिपेला जात आहे़ शहरातील संत अन्ना चर्च, सेंट सेव्हिअर्स चर्च, ह्यूम मेमोरिअल, संत जॉन, सीएनआय, गार्डन हॉल मेमोरिअल चर्चमध्ये दहा दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे़ चर्च परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली आहे़ दि़ २४ डिसेंबर रोजी रात्री बारा वाजता सामूहिक प्रार्थना होवून विविध चर्चमधील धार्मिक कार्यक्रमांना प्रारंभ होणार आहे़ नाताळनिमित्त मिठाई आणि विद्युत रोषणाईसाठी लागणार्या विविध वस्तुंच्या खरेदीसाठी बाजारपेठा सज्ज झाल्या आहेत़ विविध आकाराच्या रंगीबेरंगी विद्युत माळा, नाताळाच्या शुभेच्छा देणारे विविध आकाराचे केक शहरातील बेकरीमध्ये उपलब्ध आहेत़ शालेय विद्यार्थी आणि विद्यार्थिनीही न चुकता सायंकाळी चर्चमध्ये प्रार्थनेसाठी जमत आहेत़ सांताक्लॉजचे मुलांना मोठे आकर्षण असून, त्याबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. हा सण बच्चेकंपनीचा आनंद द्विगुणित करणारा आहे. नाताळच्या शुभेच्छा देणारी पत्रेही बाजारात दाखल झाली आहेत. नाताळ सणानिमित्त ख्रिस्ती बांधव खरेदी करण्यात दंग झाले आहेत ़ सामाजिक उपक्रम नाताळनिमित्त शहरातील विविध चर्चच्यावतीने सामाजिक कार्यक्रम राबविण्यात येत असून, सर्व रोग तपासणी शिबिर, अनाथ मुलांना खाऊ व कपड्यांचे वाटप, वृद्धाश्रमात भेट व कार्यक्रम तसेच ग्रामीण भागातही दहा दिवस विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे़ संत अन्ना चर्च, ह्यूम मेमोरिअल चर्च, संत जॉन चर्च च्यावतीने या सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे़ फोटो आहे़