शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

आरटीआय सवलतींबाबत सीबीआयचा गैरसमज हायकोर्टात उघड झाली बाब : भ्रष्टाचाराची माहिती देणेही बंधनकारक

By admin | Updated: February 15, 2015 22:36 IST

नवी दिल्ली : माहिती अधिकार कायद्याच्या(आरटीआय) सवलतींबाबत सीबीआयने गैरसमज करवून घेतल्याचे दिल्ली उच्च न्यायालयात स्पष्ट झाले. सीबीआयने आपल्या संस्थेतील अधिकाऱ्यांवरील भ्रष्टाचारांच्या आरोपांची माहितीच देऊ शकतो, त्यांनी कोणत्या प्रकरणांचा तपास केला हे सांगता येणार नाही, असे न्यायालयात नमूद केल्याने या बाबीचा उलगडा झाला.

नवी दिल्ली : माहिती अधिकार कायद्याच्या(आरटीआय) सवलतींबाबत सीबीआयने गैरसमज करवून घेतल्याचे दिल्ली उच्च न्यायालयात स्पष्ट झाले. सीबीआयने आपल्या संस्थेतील अधिकाऱ्यांवरील भ्रष्टाचारांच्या आरोपांची माहितीच देऊ शकतो, त्यांनी कोणत्या प्रकरणांचा तपास केला हे सांगता येणार नाही, असे न्यायालयात नमूद केल्याने या बाबीचा उलगडा झाला.
यापूर्वीच्या संपुआ सरकारने भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप असलेल्या मात्र त्यांच्याविषयी माहिती उघड न करण्याची सवलत असलेल्या संस्थांच्या यादीत सीबीआयचाही समावेश केला होता, मात्र आरटीआयच्या कलम २४ नुसार ते विसंगत ठरते. केंद्रीय माहिती आयोग(सीआयसी) आणि सीबीआयचे माजी संचालक ए.पी. सिंग यांचा स्पष्ट आदेश असतानाही सीबीआयने स्वत:ला मिळालेल्या सवलतीच्या नावाखालीआरटीआयसंबंधी अर्ज परत पाठवायला सुरुवात केली होती. भ्रष्टाचारासंबंधी आरोपांबाबत माहिती देणे बंधनकारक असून ती न देण्याची कोणतीही सवलत नसल्याचे कलम २४ नुसार स्पष्ट करण्यात आले आहे.
-------------------
माहितीची व्याख्या काय?
माहितीच्या व्याख्येनुसार सार्वजनिक प्राधिकरणांतर्गत येणाऱ्या कोणत्याही संस्थेबद्दलचा कोणताही मजकूर मागता येतो. त्या संस्थेबद्दल माहिती मागितली जाणे आवश्यक नाही. सीबीआयने मुख्य माहिती आयुक्त सत्येंद्र मिश्रा यांच्या आदेशाला याचिकेद्वारे आव्हान देताना आरटीआयअंतर्गत सवलतीसंबंधी कलमाचा चुकीचा अर्थ काढलेला दिसून येतो. या कलमाचा जो भाग आपल्याला अनुकूल आहे त्यावरच या संस्थेने भर दिलेला आढळून आला. केवळ एखाद्या संस्थेसंबंधी किंवा कर्मचाऱ्यांसंबंधी अहवालच नव्हे तर सार्वजनिक प्राधिकरणाच्या नियंत्रणाखालील कोणतीही माहिती या कायद्यानुसार द्यावी लागते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
------------------
हे तर कायद्याचे उल्लंघन
कोणत्याही नागरिकाला सार्वजनिक प्राधिकरणाच्या नियंत्रणाखाली असलेली कोणत्याही स्वरूपाची माहिती मागता येते. सीबीआयकडून भ्रष्टाचारासंबंधी माहिती मागितली असल्यास तीसुद्धा देणे आवश्यक आहे. केवळ कर्मचाऱ्यांवर असलेल्या आरोपांची माहितीच आम्ही देऊ शकतो हा सीबीआयचा दावा म्हणजे कायद्याचे पूर्णपणे उल्लंघन ठरते, असे प्रसिद्ध कार्यकर्ते वेंकटेश नायक यांनी म्हटले.
-------------------------
यापूर्वीच्या आदेशाचा चुकीचा अर्थ
सीबीआयने आपल्या युक्तिवादाच्या समर्थनार्थ माजी माहिती आयुक्त ए.एन. तिवारी यांच्या आदेशाचा दाखला दिला असला तरी त्याचा काढलेला अर्थ पूर्णपणे चुकीचा आहे. अर्जदाराला भ्रष्टाचारासंबंधी माहिती हवी असेल, मग ती कर्मचारी किंवा संस्थेसंबंधी असेल तरी ती आरटीआयच्या निकषावर तपासली जावी. सवलत दिल्या जाणाऱ्या माहितीमध्ये संस्थेसंबंधी माहितीचा समावेश नाही, असे तिवारी यांनी स्पष्ट केले होते.