शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
5
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
6
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
7
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
8
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
9
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
10
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
11
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
12
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
13
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
14
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
15
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
16
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
17
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
18
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
19
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट

झाडे लावण्यासाठी दिलेल्या निधीतून घेतला आयफोन-लॅपटॉप; कॅगच्या अहवालात वनविभागाबाबत धक्कादायक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2025 15:37 IST

उत्तराखंडमध्ये वनविभागाने मिळालेल्या निधीचा गैरवापर केल्याचा खुलासा कॅगच्या अहवालातून झाला आहे.

Uttarakhand Forest Division: उत्तराखंडमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान नियंत्रक आणि महालेखा परीक्षकांचा अहवाल सादर झाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. भारताच्या नियंत्रक आणि महालेखा परीक्षकांनी उत्तराखंडच्यावनविभागाच्या लेखापरीक्षणात मोठा घोटाळा झाल्याचे समोर आणलं आहे. कॅगच्या अहवालानुसार, वनीकरणासाठी दिलेला निधी वनविभागाने आयफोन, लॅपटॉप, फ्रीज आणि कुलर खरेदी, इमारतींचे नूतनीकरण, न्यायालयीन खटल्यांमध्ये वापरला आहे.

अर्थसंकल्पीय अधिवेशनात सादर केलेल्या कॅगच्या अहवालानुसार, कम्पेन्सेटरी फॉरेस्टेशन फंड मॅनेजमेंट अँड प्लॅनिंग अथॉरिटीमध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक अनियमितता झाल्याचे उघड झालं आहे. वनसंवर्धन आणि वनीकरणासाठी राखून ठेवलेला निधी आयफोन, लॅपटॉप आणि रेफ्रिजरेटर्सच्या खरेदीसह अनावश्यक खर्चासाठी वापरला गेला. यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले. या अहवालामुळे उत्तराखंडच्या राजकारणात खळबळ उडाली असून सत्ताधारी आणि विरोधक आरोप प्रत्यारोप करत आहेत.

२०१९ ते २०२२ या कालावधीतील कम्पेन्सेटरी फॉरेस्टेशन फंड मॅनेजमेंट अँड प्लॅनिंग ॲथॉरिटीच्या कामकाजाचा अहवाल कॅगकडून सादर करण्यात आला. त्यामध्येवनीकरणाव्यतिरिक्त विविध कामांसाठी १३.८६ कोटी रुपये वळवले गेल्याचे समोर आलं. या अंतर्गत, उद्योग किंवा पायाभूत सुविधांच्या कामांसाठी वापरल्या जाणाऱ्या वनांच्या उर्वरित जमिनीवर वनीकरण करण्यात येणार होतं. मात्र यासाठी बराच वेळ लागल्याने खर्च वाढला.

नियमानुसार निधी मिळाल्यानंतर, वनीकरण एक किंवा दोन वर्षात करायचे होते. मात्र कॅगच्या अहवालानुसार ३७ प्रकरणांमध्ये, अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर आठ वर्षांहून अधिक काळाने  वनीकरण करण्यात आले. यामुळे  वनीकरण वाढविण्यासाठी ११.५४ कोटी रुपयांचा खर्च वाढला. तसेच लागवड केलेल्या झाडांपैकी जगलेल्या झाडांचे प्रमाणही कमी असल्याचे समोर आलं. अहवालानुसार जगलेल्या झाडांचे प्रमाण ३३.५१ टक्के आहे. हे वृक्षारोपण खडकाळ, उतारांवर गेले होते, ज्यामुळे त्यांचे जगणे कठीण होते. या वनीकरण प्रकल्पांवर २२.०८ लाख रुपये खर्च करण्यात आले पण त्याचे परिणाम दिसले नाहीत.

तसेच १,२०४.०४ हेक्टर जमीन असलेले पाच विभाग वनीकरणासाठी योग्य नव्हते, असेही अहवालात म्हटलं आहे. या पाच विभागांसाठी डीएफओ कार्यालयाने दिलेले प्रमाणपत्र देखील चुकीचे होते आणि जमिनीची वास्तविक स्थिती तपासल्याशिवाय ते देण्यात आले होते. वनविभागाने हे प्रमाणपत्र देणाऱ्या विभागाविरोात कोणतीही कारवाई केली नसल्याचेही समोर आलं आहे.

कम्पेन्सेटरी फॉरेस्टेशन फंड मॅनेजमेंट अँड प्लॅनिंग ॲथॉरिटीचा निधी वनीकरणाशी संबंधित कामांवर खर्च करण्याऐवजी इतर बाबींवर खर्च करण्यात आला. ५६.९७ लाख रुपये जपान इंटरनॅशनल को-ऑपरेशन एजन्सी प्रकल्पाकडे कर भरणा करण्यासाठी दिले होते. डीएफओ अल्मोडा कार्यालयात सौर कुंपण करण्यासाठी १३.५१ लाख योग्य मंजुरीशिवाय खर्च करण्यात आले. जनजागृती मोहिमेसाठी राखून ठेवलेले ६.५४ लाख मुख्य वनसंरक्षक, दक्षता आणि विधी कक्षाची कार्यालये बांधण्यासाठी खर्च करण्यात आले. टायगर सफारी प्रकल्प, कायदेशीर शुल्क, वैयक्तिक प्रवास आणि आयफोन, लॅपटॉप, फ्रिज आणि कार्यालयीन साहित्य खरेदीसह विभागीय स्तरावरील इतर प्रकल्पांसाठी १३.८६ कोटींचा गैरवापर झाला. 

टॅग्स :Uttarakhandउत्तराखंडCorruptionभ्रष्टाचारforest departmentवनविभाग