शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

मोदींच्या अखत्यारित असलेल्या नोकरी बोर्डात घोटाळा, संसदीय समितीच्या अहवालात ठपका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 01:25 IST

ढासळती विश्वासार्हता आणि प्रतिमेला सावरण्यासाठी भाजपाच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या पुढ्यात संसदेच्या स्थायी समितीने एका नव्या घोटाळ््याचा खुलासा करून नवीन संकट उभे केले आहे.

- शीलेश शर्मानवी दिल्ली : ढासळती विश्वासार्हता आणि प्रतिमेला सावरण्यासाठी भाजपाच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या पुढ्यात संसदेच्या स्थायी समितीने एका नव्या घोटाळ््याचा खुलासा करून नवीन संकट उभे केले आहे. मध्य प्रदेशातील मोठ्या व्यापमं (व्यावसायिक परीक्षा मंडळ) घोटाळ््यानंतर शिक्षण क्षेत्रातील नोकऱ्यांच्या नियुक्त्यांबाबत हा दुसरा मोठा घोटाळा मानला जात आहे.संसदेच्या स्थायी समितीच्या १४ मार्चच्या अहवालात म्हटले आहे की, केंद्र सरकारच्या नोकºयांसाठी इच्छुकांची निवड करणारे सेवा निवड मंडळ (सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड-एसएसबी) या घोटाळ््याचे केंद्र बनले आहे. विशेष म्हणजे हा विभाग थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नियंत्रणाखालील आहे.नुकत्याच झालेल्या परीक्षांच्या माध्यमातून ५० हजार नियुक्त्या केल्या जाणार होत्या. परंतु, एसएसबीमध्ये सुरू असलेल्या गडबडीनंतर या सगळ््यावरच प्रश्नचिन्ह लागले आहे. कारण एकानंतर एक परीक्षेसाठी तयार केलेली प्रश्नपत्रिका परीक्षेच्या आधीच बाहेर पडली व हे एसएसबीने स्वत: या संसदीय समितीपुढे मान्य केले आहे. डिसेंबर २०१६ पर्यंत आठ प्रश्न फुटले व त्यानंतर दोन. हे प्रश्न कोणी फोडले व कसे बाहेर आले याचा खुलासा केला जात नाही. संसदीय समितीने यावर अहवालात तीव्र नापसंती व्यक्त केली आहे. काँग्रेसने सोमवारी हा मुद्दा उपस्थित करून पंतप्रधान कार्यालयातील राज्यमंत्री व एसएसबीचे अध्यक्ष असीम खुराणा यांना ताबडतोब पदमुक्त करण्याची मागणी केली. ५० हजार जागांसाठी दोन कोटी विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते, आता त्यांचे भवितव्य मोदी सरकारने संकटात लोटल्याचा आरोप सूरजेवालांनी केला.काँग्रेस म्हणते, असा केला गेला घोटाळाकाँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सूरजेवाला यांनी पेपरफुटी कशी होत होती हे तपशिलासह हे सांगितले. त्यांचा दावा आहे की, एसएसबीने परीक्षा आयोजित करण्याआधी आॅनलाइन परीक्षेसाठी खासगी संस्थांसाठी निविदा जारी केली होती. मात्र अट अशी होती की परीक्षा घेण्यासाठी प्रश्नपत्रिका दोन तास आधीच उपलब्ध करून दिल्या जाणार होत्या. या प्रश्नपत्रिका एसएसबीच्या मुख्यालयात सुरक्षित संगणक व सर्व्हरवर असतील. पण मुख्यालयात कोणतेच सुरक्षित संगणक व सर्व्हर नाहीत. म्हणजेच ज्या कंपन्यांना परीक्षेचे कंत्राट दिले त्यांच्याच संगणकावरून प्रश्नपत्रिका अपलोड केले जात होत्या. हे काम चेन्नईत केले जात होते. या कंपन्यांनी प्रश्नपत्रिका वेळेआधीच बाहेर आणली. मोठी कमाई केली जाऊ शकते असा विचार करून कंपन्यांनी रिमोट अ‍ॅक्सेस सॉफ्टवेअरच्या सहाय्याने ती फोडली. काँग्रेसने एक व्हिडिओ क्लीप जारी करून हे दाखवले की कशा पद्धतीने विद्यार्थी बाजारात विकत आहे. शिवाय एका विद्यार्थ्याला ७०० प्रवेशपत्रे दिल्याचे सांगत काँग्रेस प्रश्न फुटल्याच्या तारखा दिल्या आहेत.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी