असिम सरोदे
By admin | Updated: February 13, 2015 23:11 IST
याविषयी रमा सांगतात, मी मुळची कर्नाटकची होते. शिवाय विभक्त कुटुंबातील तर असिम हा विदर्भातील मोठ्या कुटुंबातील. आमच्या दोघांच्या कुटुंबियांच्या दृष्टीने भाषेची एक मोठी अडचण ही होती पण नाते म्हटले की त्यावर मात करणे ओघानेच आले. आज कुटंुबात इतके रूळले की असिम इतकेच मलाही मुलीप्रमाणे प्रेम मिळत आहे. अनेकदा एकाच व्यवसायत ...
असिम सरोदे
याविषयी रमा सांगतात, मी मुळची कर्नाटकची होते. शिवाय विभक्त कुटुंबातील तर असिम हा विदर्भातील मोठ्या कुटुंबातील. आमच्या दोघांच्या कुटुंबियांच्या दृष्टीने भाषेची एक मोठी अडचण ही होती पण नाते म्हटले की त्यावर मात करणे ओघानेच आले. आज कुटंुबात इतके रूळले की असिम इतकेच मलाही मुलीप्रमाणे प्रेम मिळत आहे. अनेकदा एकाच व्यवसायत असले की सर्वच बारीक-सारीक गोष्टी एकमेकांना माहीत असतात मात्र त्याचा फायदा होण्याऐवजी काही वेळा तोटे होतात याबाबत रमा म्हणतात की, एकाच व्यवसायात असल्याने आमचा मित्रपरिवार, भेटायला येणारी लोकांचे वर्तुळ तोच तो असल्याचा तोटा आहे पण तरीही एकमेकांना पुर्णपणे पुरक असल्याने एकाच व्यवसायातील शेअरिंगची मजा ही निराळीच असते. यावर असिम म्हणाले की, आमच्यात व्यवसायावरून कधीच वाद झाले नाहीत कारण रमाने पहिल्यापासूनच सामाजिक वकिली करण्याचे ठरवलेले होते. तर मी वकिली करायचे हे निित त्यामुळे आम्ही एकाच व्यवसायत असूनही एकमेकांच्या स्पर्धेत नाहीत. याउलट ती अतिशय समजूतदार असल्याने आमचे छान शेअरिंग होते. मोकळ्या वेळेत कामाविषयी एकमेकांना सांगतो. त्यामुळेच आमच्या नात्यात नाविण्य व ताजेपणा टिकून आहे.