नवी दिल्ली : अगुस्ता वेस्टलँडकडून 12 व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर खरेदीतील कथित लाच प्रकरणी आंध्रचे राज्यपाल ई.एस.एल. नरसिंहन यांची सीबीआयकडून चौकशी केली जाणार आहे.
नरसिंहन यांच्यासोबत तत्कालीन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार एम.के. नारायणन व तत्कालीन एसपीजी प्रमुख बी.वी. वांचू यांनी या बैठकीत भाग घेतला होता. ज्यात सेवासंबंधी निगडित बदलांना मान्यता देण्यात आल्याने अगुस्ता वेस्टलँड या सौद्यासाठी पात्र ठरले होते. अलीकडेच सीबीआयने अगुस्ता वेस्टलँडसमोबत हेलिकॉप्टर खरेदीतील 36क् कोटींच्या लाच प्रकरणात नारायणन व वांचू यांची साक्षीदार म्हणून चौकशी केली होती.
हे दोघेही निकष बदलण्याच्या बैठकीस उपस्थित असल्याने त्यांचे जबाब नोंदविण्याची गरज भासली. या बैठकीस नरसिंहन हेदेखील हजर होते त्यामुळे त्यांचाही जबाब महत्त्वपूर्ण असल्याचे सीबीआयचे म्हणणो आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)