अहमदनगर इंडस्ट्रीयल इस्टेट को. ऑप. सोसायटी लि. अहमदनगर
By admin | Updated: February 14, 2015 23:52 IST
अहमदनगर : अहमदनगर इंडस्ट्रीयल इस्टेट को.ऑप. सोसायटी लि. अहमदनगर या संस्थेच्या संचालक मंडळाची सभा अध्यासी अधिकारी श्री. एस. व्ही. निकम यांच्या अध्यक्षतेखाली झाली.
अहमदनगर इंडस्ट्रीयल इस्टेट को. ऑप. सोसायटी लि. अहमदनगर
अहमदनगर : अहमदनगर इंडस्ट्रीयल इस्टेट को.ऑप. सोसायटी लि. अहमदनगर या संस्थेच्या संचालक मंडळाची सभा अध्यासी अधिकारी श्री. एस. व्ही. निकम यांच्या अध्यक्षतेखाली झाली.सदर सभेत चेअरमनपदी संतोष माणकचंद बोथरा यांची निवड करावी, असे संचालक राजेंद्र कांतीलाल चोपडा यांनी सुचवले. त्यास संचालक नितीन सुभाषलाल पटवा यांनी अनुमोदन दिले. दुसरा कोणताही प्रस्ताव न आल्यामुळे चेअरमनपदी श्री. संतोष माणकचंद बोथरा सर्वानुमते निवड झाल्याचे अध्यासी अधिकारी यांनी जाहीर केले.सदर सभेत व्हाईस चेअरमनपदी संतोष कनकमल बोरा याची निवड करावी, असे संचालक मेहुल कुंतीलाल भंडारी यांनी सुचवले, त्यास संचालक सतिष बन्सीलाल बोरा यांनी अनुमोदन दिले. दुसरा कोणताही प्रस्ताव न आल्यामुळे व्हा. चेअरमनपदी संतोष कनकमल बोरा यांची सर्वानुमते निवड झाल्याचे अध्यासी अधिकारी यांनी जाहीर केले.सभेस अरविंद गुंदेचा, सोनल चोपडा, सौ. प्रमिलाबाई बोरा, सौ. आरती मेहेर इ. सर्व संचालक उपस्थित होते.चेअरमन संतोष बोथरा यांनी आपल्या भाषणात सर्व संचालक व कारखानदारांच्या सहकार्याने वसाहतीच्या रोड, पाणीपुरवठा इ. अडचणी सोडविल्या जातील, असे सांगितले.