अहमदपूर : भाजपाचे ज्येष्ठ नेते स्व़ गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंतीनिमित्त भाजपाच्या तालुका शाखेच्या वतीने शुक्रवारी विविध समाजोपयोगी उपक्रम घेण्यात आले़शहरातील निवासी संत ज्ञानेश्वर अपंग विद्यालयात, लांजी येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शैैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले़ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छता भारत अभियानास प्रतिसाद म्हणून शहरातील बसस्थानकाचा परिसर भाजपा पदाधिकार्यांनी व कार्यकर्त्यानी स्वच्छ केला़ यावेळी भाजपाचे प्रदेश प्रवक्ते गणेश हाके, सदस्य दिलीपराव देशमुख, कृउबा सभापती ॲड़ भारत चामे, माजी आमदार बब्रुवान खंदाडे, माजी सभापती अशोकराव कंेद्रे, त्र्यंबक गुे, नवनाथ सुरनर, बाळासाहेब होळकर, भगवान साळुंके, मदन मुसळे, बालाजी मुंडे, बाळू केंद्रे, राम केंद्रे, विनायक गुणाले आदी उपस्थित होते़ प्रास्ताविक प्रा़ हणमंत देवकत्ते यांनी केेले़ सूत्रसंचालन राम केंद्रे यांनी केले़ आभार बाळू केंद्रे यांनी मानले़ अहमदपूर बंदला संमिश्र प्रतिसादविविध मागण्या : ऊसाला भाव द्याअहमदपूर : अहमदपूर आणि चाकूर तालुका दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करावा यासह अन्य मागण्यांसाठी येथील जन आंदोलन प्रबोधन समिती व भारतीय दलित पँथरच्या यांच्या वतीने शुक्रवारी अहमदपूर बंदचे आवाहन करण्यात आले होते़ त्यास संमिश्र प्रतिसाद मिळाला़हे आंदोलन सामाजिक कार्यकर्ते सुप्रिय बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली झाले़ आंदोलनात लक्ष्मीकांत बनसोडे, रज्जबखान पठाण, तौफिक सय्यद, राहुल लामतुरे, साबेर काजी, विशाल साबळे, इरफान शेख, महेंद्र ससाणे, भगवान नामपल्ले आदी सहभागी झाले होते़ शहरातील बहुतांश दुकाने दिवसभर बंद होती़ उसाला ३ हजार रूपये भाव द्यावा, माजी मंत्री, खासदार, आमदारांचे पेन्शन बंद करून शेतकर्यांना पेन्शन चालू करावे़ मराठा, मुस्लिम समाजाला आरक्षण द्यावे, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या़
अहमदपुरात स्वच्छता मोहीम
By admin | Updated: December 14, 2014 00:09 IST