अभिजित कोळपे बातमी : तोडणीला आलेला दीड एकर ऊस खाक
By admin | Updated: February 15, 2015 22:36 IST
नारायणपूर : सासवड-सुपे खुर्द रस्त्यानजीक असणार्या इनामके मळा येथील शेतातील तोडणीला आलेला दीड एकर ऊस शेतकरी मनोज काळुराम इनामके यांच्या मालकीचा होता. तो अज्ञात व्यक्तीने १४ फेब्रुवारीच्या रात्री पेटवून दिल्याने संपूर्ण उसाच्या पिकाचे नुकसान झाले आहे.
अभिजित कोळपे बातमी : तोडणीला आलेला दीड एकर ऊस खाक
नारायणपूर : सासवड-सुपे खुर्द रस्त्यानजीक असणार्या इनामके मळा येथील शेतातील तोडणीला आलेला दीड एकर ऊस शेतकरी मनोज काळुराम इनामके यांच्या मालकीचा होता. तो अज्ञात व्यक्तीने १४ फेब्रुवारीच्या रात्री पेटवून दिल्याने संपूर्ण उसाच्या पिकाचे नुकसान झाले आहे.या आगीत हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. संपूर्ण शिवारात देखना ऊस बहरला होता. कोणी तरी अनोळखी व्यक्तीने आकसापोटी हे कृत्य केले असावे, असा संशय शरद इनामके, काळुराम इनामके, मनोज इनामके यांनी व्यक्त केला. जळलेल्या उसाचा पंचनामा करून त्याची नुकसानभरपाई त्वरित मिळावी, अशी मागणी या शेतकर्यांनी केली आहे. तसेच, ऊस पेटविणार्या व्यक्तीचा शोध घेऊन त्यास कडक शासनाची मागणी केली आहे.फोटो ओळी : इनामके मळा येथील शेतातील तोडणीला आलेला दीड एकरातील जळालेला ऊस.