अभिजित : बेपत्ता तरुणाचा मृतदेह आढळला
By admin | Updated: August 26, 2015 23:32 IST
आळेफाटा : पिंपळवंडी येथून तीन दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या तरुणाचा मृतदेह आज सकाळी बोरी शिवारात कुकडी कालव्यामध्ये आढळून आला.
अभिजित : बेपत्ता तरुणाचा मृतदेह आढळला
आळेफाटा : पिंपळवंडी येथून तीन दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या तरुणाचा मृतदेह आज सकाळी बोरी शिवारात कुकडी कालव्यामध्ये आढळून आला. आळेफाटा पोलीस ठाण्यातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपळवंडी येथून शनिवारी (दि. २२) रात्री ८ वाजण्याच्या सुमारास शिवराम अण्णा पवार (वय २१) हा तरुण घरातून बाहेर गेला. रात्री उशिरापर्यंत तो घरी परत न आल्याने त्यांच्या नातेवाइकांनी शोध घेतला. त्याचे वडील अण्णा पवार यांनी आळेफाटा पोलीस ठाण्यात शिवराम बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती. दरम्यान, आज सकाळी येडगाव धरणाच्या कुकडी कालव्यात बोरी शिवारातील डेरेमळा येथील पुलाच्या कडेला तरुणाचा मृतदेह असल्याचे ग्रामस्थांनी पोलिसांना सांगितले. हा मृतदेह शिवरामचा असल्याची नातेवाइकांची खात्री झाली. याबाबत अधिक तपास सुरू आहे. ०००