सव्वा लाख शेतकर्यांना खरीप अनुदानाची प्रतीक्षा ३० कोटींचे अनुदान वाटप बाकी : भडगाव, जामनेर, जळगावातील शेतकरी वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2016 23:03 IST
जळगाव : अत्यल्प पाऊस आणि दुष्काळीस्थिती यामुळे हताश झालेल्या बळीराजाला दिलासा मिळावा यासाठी राज्य शासनाने जिल्ासाठी १७६ कोटी रुपयांचे अनुदान दिले होते. मात्र अद्याप एक लाख १९ हजार ५९१ शेतकर्यांना दुसरा खरीप हंगाम सुरु झाला तरीदेखील मदत न मिळाल्याने प्रतिक्षा आहे. भडगाव, जामनेर व जळगाव तालुक्यात अनुदान वाटपाची संथगती आहे.
सव्वा लाख शेतकर्यांना खरीप अनुदानाची प्रतीक्षा ३० कोटींचे अनुदान वाटप बाकी : भडगाव, जामनेर, जळगावातील शेतकरी वंचित
जळगाव : अत्यल्प पाऊस आणि दुष्काळीस्थिती यामुळे हताश झालेल्या बळीराजाला दिलासा मिळावा यासाठी राज्य शासनाने जिल्ासाठी १७६ कोटी रुपयांचे अनुदान दिले होते. मात्र अद्याप एक लाख १९ हजार ५९१ शेतकर्यांना दुसरा खरीप हंगाम सुरु झाला तरीदेखील मदत न मिळाल्याने प्रतिक्षा आहे. भडगाव, जामनेर व जळगाव तालुक्यात अनुदान वाटपाची संथगती आहे.जिल्ातील १२९२ गावातील शेतकर्यांना लाभखरीप अनुदानाचे जिल्ातील १२९२ गावातील शेतकर्यांना लाभ देण्यात आला आहे. त्यात जळगाव जिल्ातील ९२, जामनेर १५२, एरंडोल ६५, धरणगाव ८९, पारोळा ११४, भुसावळ ५४, बोदवड ५२, मुक्ताईनगर ८१, यावल १०, रावेर १९, पाचोरा १२७, भडगाव ६०, अमळनेर १५४, चोपडा ८७, चाळीसगाव १३६ गावातील शेतकर्यांना लाभ देण्यात आला आहे.एक लाख १९ हजार शेतकर्यांना अनुदानाची प्रतीक्षाखरीप अनुदानासाठी जिल्ातील तीन लाख ९९ हजार २४६ शेतकरी पात्र ठरले आहेत. त्यापैकी दोन लाख ७९ हजार ६५५ शेतकर्यांना खरीप अनुदान वितरित करण्यात आले आहे. त्यामुळे अद्याप एक लाख १९ हजार ५९१ शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत. यात भडगाव तालुक्यातील ३१ हजार ७५६ बाधित शेतकर्यांपैकी केवळ ८ हजार ८४१ शेतकर्यांना तर जामनेर तालुक्यातील ५६ हजार २४२ पैकी २८ हजार ८२८ शेतकर्यांना मदत मिळाली आहे. जळगाव तालुक्यातील ३२ हजार ३०५ शेतकर्यांपैकी १८ हजार ७८१ शेतकर्यांना मदत मिळाली आहे.१७६ कोटी रुपयांच्या अनुदानाचे वितरणशासनाकडून जिल्हा प्रशासनाला खरीप अनुदानाचे १७६ कोटी २८ लाख ५४ हजार ७७७ हजार रुपये प्राप्त झाले. जिल्हा प्रशासनाने सर्व रक्कम तहसीलदारांकडे वितरित केली. मात्र आतापर्यंत या अनुदानापैकी केवळ १४६ कोटी २८ लाख ५४ हजार ७७७ रुपयांचे अनुदान हे शेतकर्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले आहेत. १८ टक्के शेतकर्यांना अजूनही खरीप अनुदानाचा लाभ मिळालेला नाही.शासकीय काम सहा महिने थांबगेल्यावर्षी खरीप हंगामात झालेल्या नुकसानीची रक्कम ही शेतकर्यांना देण्यात येत आहे. यावर्षी दुसरा खरीप हंगाम सुरु झाला असताना तब्बल एक लाख १९ हजार ५९१ शेतकरी मदतीसाठी अद्यापही वंचित आहेत. त्यामुळे शासकीय काम सहा महिने थांब असा अनुभव शेतकर्यांना येत आहे. त्रस्त झालेला शेतकरी हा तहसील कार्यालयात फेर्या मारत आहे.