१५... सारांश
By admin | Updated: February 16, 2015 02:02 IST
ग्रामपंचायत सदस्यांची तीन दिवसीय कार्यशाळा
१५... सारांश
ग्रामपंचायत सदस्यांची तीन दिवसीय कार्यशाळातारसा : स्थानिक ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामपंचायत सदस्यांची तीन दिवसीय कार्यशाळा नुकतीच पार पडली. यात ग्रामपंचायत कारभार, ग्रामसभा, विविध अभियान, योजना याबाबत विस्तृत माहिती देण्यात आली. यावेळी चंद्रकला येळणे, शेषराव देशमुख, लता गिरउकर, मंजुषा राऊत, सविता हटवार, मनोज नौकरकर, क्रिष्णा चापले याच्यासह अन्य ठिकाणचे ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. ***जनता दरबारात समस्यांचा पाऊसरामटेक : स्थानिक राजीव गांधी सभागृहात आ. डी. मल्लिकार्जुन रेड्डी यांच्या जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. त्यात नागरिकांनी त्यांच्या विविध समस्या मांडल्या. यातील बहुतांश समस्या सोडविण्याचे आश्वासन रेड्डी यांनी दिले असून, संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले. यावेळी विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.*** कमी उंचीचे पूल बनले धोकादायकसावनेर : तालुक्यातील अंतर्गत मार्गावरील नदी नाल्यांवर अनेक पूल कमी उंचीचे आहेत. पावसाळ्यात त्या पुलांवरून पाणी वाहात असल्याने अपघाताची शक्यता बळावली आहे. वारंवार मागणी करूनही त्या पुलांची उंची वाढविली जात नाही, असा आरोप नागरिकांनी केला आहे.***गुप्तगंगा देवस्थानात धार्मिक कार्यक्रमदेवलापार : स्थानिक गुप्तगंगा देवस्थानात महाशिवरात्रीनिमित्त यात्रा भरते. शिवाय, विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. सदर कार्यकम दोन दिवस चालणार आहेत. महाप्रसाद वितरणाने कार्यक्रमाची सांगता होणार आहे. या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. ***सूर नदीतील रेतीचा उपसा करामौदा : तालुक्यातील सूर नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात रेतीचा साठा गोळा झाला आहे. ती रेती चोरून नेली जात आहे. शिवाय, रेतीमुळे नदीचा प्रवाह बदलत आहे. त्यामुळे काही गावांना पुराचा धोका उद्भवण्याची शक्यता निर्माण झाल्याने या नदीतील रेतीघाटांचा लिलाव करून रेती उपसा करावा, अशी मागणी सरपंचांनी केली आहे.*** रिक्त पदांमुळे रुग्णांचे हालनरखेड : तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय व तीन प्राथमिक आरोग्य केंद्रात महत्त्वाच्या कर्मचाऱ्यांची काही पदे रिक्त आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढला असून, नागरिकांना चांगल्या आरोग्य सेवेपासून वंचित राहावे लागत असल्याने गरीब रुग्णांचे हाल होत आहे. आरोग्य विभागातील रिक्त पदे तत्काळ भरण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.***