०६... खापा... पोकलॅण्ड
By admin | Updated: February 6, 2015 22:35 IST
(फोटो)
०६... खापा... पोकलॅण्ड
(फोटो)पोकलॅण्ड मशीनमुळे पिकांचे नुकसाननंदापूर शिवारातील प्रकार : खापा पोलीस ठाण्यात तक्रार दाखलखापा : रेती उत्खननासाठी वापरण्यात येणारी पोकलॅण्ड मशीन शेतातूून नेल्याने शेतकऱ्याच्या पिकाचे तसेच शेतीपयोगी साहित्याचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी शेतकऱ्याने खापा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. ही घटना खापा नजीकच्या नंदापूर शिवारात घडली.खापा येथील शेतकरी सुरेश रामचंद्र गाडीगोणे यांची नंदापूर - करजघाट परिसरात शेती आहे. परिसरातील रेतीघाटातून महेश कुंजीलाल गुप्ता रा. कामठी हे ठेकेदार रेतीउत्खनन करतात. त्यासाठी ते पोकलॅण्ड मशीनचा वापर करतात. दरम्यान, मंगळवारी रात्री त्यांच्या चालकाने गाडीगोणे यांच्या शेतातून पोकलॅण्ड मशीन नेली. त्यामुळे पिकांचे तर नुकसान झाले. शिवाय, शेतात ठेवलेली बैलगाडी पूर्णपणे तुटली असून, शेजारी बांधलेली म्हैस गंभीर जखमी झाल्याचे गाडीगोणे यांनी सांगितले. शेतातील मोठे झाड उन्मळून पडले. गाडीगोणे दुसऱ्या दिवशी शेतात गेले असता, त्यांना हा प्रकार निदर्शनास आला. त्यांनी ठेकेदार गुप्ता यांच्याशी संपर्क साधून नुकसानभरपाई देण्याची मागणी केली. मात्र, गुप्ता यांनी नुकसानभरपाई देण्यास नकार दिल्याने त्यांनी अखेर खापा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. शिवाय, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अंतुलकर यांनी जखमी म्हशीवर उपचार करण्यास नकार दिल्याचे गाडीगोणे यांनी सांगितले. या प्रकरणी खापा पोलिसांनी सुरुवातीला अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली होती. (प्रतिनिधी)***