शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या शाही मिरवणूक मार्गाचे रुंदीकरण ७५ कोटी रुपयांची आणखी गरज

By admin | Updated: December 28, 2014 01:03 IST

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या शाही मिरवणूक मार्गाचे रुंदीकरण ७५ कोटी रुपयांची आणखी गरज

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या शाही मिरवणूक मार्गाचे रुंदीकरण करण्याची महापालिकेने तयारी करून, त्यासाठी जागा संपादित करण्याबाबत सुमारे २५ कोटी रुपये खर्च अपेक्षित धरला असला तरी, प्रत्यक्षात जागेचा मोबदला व त्या जागेवर असलेल्या कच्च्या-पक्क्या स्वरूपाच्या बांधकामाची नुकसानभरपाई देण्यासाठी जवळपास ७५ कोटी रुपयांची आणखी गरज भासणार असल्याने महापालिकेची सद्याची आर्थिक परिस्थिती पाहता शाहीमार्गाचे रुंदीकरण कागदावरच ठरण्याची चिन्हे आहेत. दुसरीकडे भूसंपादन अधिकाऱ्यांनी भूसंपादन कायद्याच्या कलम ९ अन्वये सर्व जागामालकांना नोटीस बजावून त्यांना म्हणणे मांडण्याची अंतिम संधी दिली आहे. मात्र या नोटिशीच्या आधारे कोणत्याही परिस्थितीत रुंदीकरणासाठी जागा संपादित केली जाईल असा त्या नोटिशीचा अर्थ आहे, तर शाहीमार्गाच्या रुंदीकरणाऐवजी पर्यायी मार्गाने मिरवणूक काढण्यासाठी साधु-महंतांचे मन वळविण्याची तयारी प्रशासनाने दर्शविल्यामुळे एकूणच रुंदीकरणाचा गुंता दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. रमणी आयोगाच्या शिफारशीनुसार शाहीमार्गाच्या रुंदीकरणाचा प्रस्ताव तयार करून त्यादृष्टीने महापालिकेने तयारी चालविली असून, जिल्हाधिकाऱ्यांकरवी शाहीमार्गाच्या रुंदीकरणासाठी जागा संपादित करण्यासाठी विशेष भूसंपादन अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मिरवणूक मार्गाच्या जाण्याच्या व परतीच्या मार्गाचे मिळून सुमारे ६५८० चौरस मीटर जागेच्या संपादनासाठी २५ कोटी रुपये आर्थिक तरतूद धरण्यात आली आहे. त्यापैकी महापालिकेने दोन कोटी रुपये भूसंपादन अधिकाऱ्याकडे जमा केले असून, उर्वरित निधीची प्रतीक्षा आहे. दरम्यान, सिंहस्थ कुंभमेळा तोंडावर येऊन ठेपल्याने शाहीमार्गाच्या रुंदीकरणाच्या व त्या अनुषंगाने भूसंपादनाच्या तयारीला वेग देऊन भूसंपादन अधिकाऱ्यांनी निवाडा जाहीर करून कलम ९ची नोटीसही बजावली आहे. या नोटिसीचा अर्थ म्हणजे शासनाने सदर जागा संपादित करण्याचा अंतिम निर्णय घेतला असून, त्यात कोणताही बदल होणार नाही. या उपरही जागामालकांना त्यांचे काही म्हणणे मांडायचे असल्यास त्यांनी लेखी स्वरूपात ३१ डिसेंबरपर्यंत ते सादर करण्याची मुदत देण्यात आली आहे. एकीकडे भूसंपादनाची तयारी अंतिम टप्प्यात आलेली असताना जागामालकांना मोबदला देऊन जागा ताब्यात घेण्याबाबत महापालिकेचे आस्तेकदम सुरू झाले आहे. निधीची तरतूदच होत नसल्याने भूसंपादनालाही खीळ बसली असूून, जागा ताब्यात घेण्यासाठी २५ कोटी व त्या जागेवर सद्य:स्थितीत जे काही बांधकाम आहे ते तोडल्याची भरपाई म्हणून सुमारे ७५ कोटींची गरज लागणार आहे. महापालिकेची त्याला तयारी नाही. उलट शाही मिरवणुकीसाठी पर्यायी मार्गाचा विचार पुढे येऊन त्याला प्रशासन व स्थानिक साधु-महंतांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळू लागल्याने जवळपास शंभर कोटी रुपये खर्च करून जुन्या शाहीमार्गाच्या रुंदीकरणास महापालिका मुरड घालण्याच्या तयारीत आहे. जुन्या मार्गाच्या रुंदीकरणाबाबत जागामालकांचे एकूणच मत व त्याला विरोध झाल्यास हीच बाब पुढे करून महापालिका रुंदीकरणाविषयी आपली मान सोडवून घेण्याच्या मन:स्थितीत आहे. (प्रतिनिधी)