निवेदनात म्हटले आहे की, शासनाने प्रशासनाद्वारे अनेक निर्बंध ठिकठिकाणी शिथिल करणे सुरु केले आहे, परंतु आठवडे बाजारातील हातावर पोट भरण्यासाठी बाजाराचा आधार घेऊन आपली गुजराण करणारे गरीब व छोटे व्यावसायिक यांच्यावर मात्र वक्रदृष्टी कायम ठेवली असून अद्यापही आठवडे बाजाराला प्रशासनाने परवानगी दिलेली नाही. हा छोट्या व्यावसायिकांच्या पोटावर पाय देण्याचा प्रकार आहे. कोरोना महामारीला फक्त आठवडे बाजारातील छोटे व्यावसायिकच याला जबाबदार आहेत का असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
निवेदनावर माजी नगरसेवक छोटू सोनवणे, राजाराम सोनू पवार, श्रीपाद कायसथ, निलेश भामरे, मधुकर जाधव, गौरव मेटकर, अरुण अंधारे यांच्यासह अनेक छोटे मोठे व्यावसायिक यांच्या सह्या आहेत.
फोटो - २२ सटाणा २
सटाणा येथील पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांना निवेदन देताना फिरोज तांबोळी, कृष्णा जगताप, छोटू सोनवणे, संजय पाटोळे, सुनील मोरे, जयेश बागुल आदी.
220821\22nsk_7_22082021_13.jpg
सटाणा येथीलपोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांना निवेदन देतांना फिरोज तांबोळी, कृष्णा जगताप, छोटू सोनवणे, संजय पाटोळे, सुनिल मोरे, जयेश बागुल आदि.