शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलने सीझफायर तोडले, ट्रम्प प्रचंड नाराज; म्हणाले, तातडीने पायलटना माघारी बोलवा...
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
3
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
4
तुर्कीला धडा शिकवण्याची तयारी सुरू?; सर्वात मोठ्या शत्रूच्या देशात पोहचले भारतीय हवाई दल प्रमुख
5
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
6
Panchayat 4 Review : 'वो अफ़्साना जिसे अंजाम तक लाना न हो मुमकिन..'; दुर्दैवाने 'पंचायत ४'विषयी हेच म्हणावं लागेल
7
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
8
Nuclear Weapon : कोणता देश अणुबॉम्ब बनवतोय अन् कोणता नाही? कसं आणि कोण ठेवतं लक्ष? जाणून घ्या...
9
“भास्कर जाधवांनी शिंदेंचे नेतृत्व स्वीकारले तर आनंद, मातोश्रीवरचा राग...”; कुणी दिला सल्ला?
10
दिलजीत दोसांझच्या सिनेमात पाकिस्तानी अभिनेत्रीची भूमिका, टीका झाल्यावर म्हणाला...
11
Rahul Gandhi :'निवडणुका नियमांनुसार होतात', राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचे उत्तर; चर्चेसाठी बोलावले
12
अपघाताच्या एक दिवस आधी एअर इंडियाच्या सीईओंचा पगार ४६% वाढवला; आता किती पैसे मिळतात?
13
विहिरीत पडलेल्या वासराला वाचवण्यासाठी उतरलेले तरुण एका पाठोपाठ एक बेशुद्ध पडले, पाच जणांचा मृत्यू, संपूर्ण गावावर शोककळा  
14
प्रेक्षकांची प्रतीक्षा आज संपणार; काही तासात सुबोध भावे-तेजश्रीच्या मालिकेचा प्रोमो येणार; पाहा झलक
15
"हात लावशील तर ३५ तुकडे करेन"; मधुचंद्राच्या रात्रीच नवरीने दिली थेट धमकी! म्हणाली...
16
केदारनाथला देवाकडे काय मागितलं? चाहत्याचा प्रश्न, अमृताचं मन जिंकणारं उत्तर, म्हणाली- "खरं सांगू..."
17
अहमदाबाद विमान अपघात: ब्लॅक बॉक्सची माहिती कधीपर्यंत मिळेल? केंद्रीय मंत्री नायडू म्हणाले...
18
हिंदी मोफत शिकवत असतील तर त्यात गैर काय?; राष्ट्रवादी आमदार संग्राम जगतापांचा सवाल
19
ज्या कतारवर हल्ला केला, त्याच कतारच्या शेखने फोन केला...; अन् इराण सीझफायरसाठी तयारही झाला...
20
"अमेरिकेला गुडघे टेकायला लावले, इराण बनला मुस्लिम जगताचा नेता’’, महबूबा मुफ्ती यांनी केलं कौतुक  

राष्ट्रवादीत छबूचा गॉडफादर कोण?

By admin | Updated: January 7, 2017 01:31 IST

चलबिचल : दशकभरापासून पक्षात कार्यरत

 नाशिक : राष्ट्रवादी कॉँग्रेसचे पक्षाध्यक्ष खासदार शरद पवार यांनी थेट ‘रत्न’ असा उल्लेख करीत, अशा लोकांना पक्षात आणले कोणी? याचा तपास तटकरेंनी घेतला पाहिजे, असे विधान केल्याने आता राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या गोटात चलबिचल सुरू झाली आहे.छबू नागरे हा नाशिक शहर राष्ट्रवादी कॉँग्रेसचा विद्यमान कार्याध्यक्ष होता. कार्याध्यक्ष हे पदच गेल्या काही महिन्यांपूर्वी निर्मिले गेले. नागरे सोबतच जिल्हा राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या कार्याध्यक्षपदी जिल्हा परिषदेचे माजी सभापती विष्णुपंत म्हैसधुणे यांची, तर युवक कॉँग्रेसच्या कार्याध्यक्षपदी वैभव देवरे यांची निवड करण्यात आली.तत्पूर्वी छबू नागरे याने राष्ट्रवादी विद्यार्थी कॉँग्रेस, जिल्हा युवक राष्ट्रवादी कॉँग्रेस मध्ये काम केले आहे.त्याला राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये आणण्यात पक्षाच्याच एका नेत्याचा जसा हात असल्याची चर्चा आहे, तसाच त्याला विविध पदे मिळवून देण्यात दुसऱ्या एका पदाधिकाऱ्याचा हात असल्याची चर्चा आहे. अर्थात झाल्या प्रकारानंतर हे सर्व ‘तेरी भी चूप, मेरी भी चूप’ असून छबू नागरेबाबत पक्षाच्या वरिष्ठांना माहिती देण्यास कोणीही पदाधिकारी किंवा कार्यकर्ता पुढे येणार नाही, असे चित्र आहे. त्यामुळे स्वत: शरद पवार यांनी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना छबू नागरे यांना पक्षात कोणी आणले? त्याचे पक्षातील गॉडफादर कोण? हे शोधण्याचे आदेश दिलेले असले तरी प्रत्यक्षात यातून काही बाहेर येईल, याची शक्यता कमीच आहे. (प्रतिनिधी)