शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

जलसंपत्ती जपणे काळाची गरज जलउत्सवात प्रबोधन : सखींनी घेतली पाणीबचतीचे प्रतिज्ञा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2018 00:51 IST

नाशिक : जलसंपत्ती जपणे ही काळाची गरज असून, सर्वांनी पाण्याचा हक्काने वापर करताना त्याविषयी जबाबदारीची जाणीव ठेवून पाणीबचतीसाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.

ठळक मुद्दे पाण्याचे योग्य नियोजन करून सर्वांना ते उपलब्ध होऊ शकेलजलबचतीचा संदेश देण्याचा विश्वविक्रम

नाशिक : जलसंपत्ती जपणे ही काळाची गरज असून, सर्वांनी पाण्याचा हक्काने वापर करताना त्याविषयी जबाबदारीची जाणीव ठेवून पाणीबचतीसाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे, तरच भावीपिढीसाठी उपयुक्त जलसाठा राहील. तसेच पाण्याचे योग्य नियोजन करून सर्वांना ते उपलब्ध होऊ शकेल, असा विचार लोकमत सखी मंचसाठी आयोजित रिन आणि लोकमत प्रस्तुत ‘जलउत्सव’ या कार्यक्रमात मान्यवर वक्त्यांनी मांडला.सिडको परिसरातील उत्तमनगर येथील भोळे मंगल कार्यालयात शनिवारी (दि.२६) लोकमत मंच आणि अन्य महिलांसाठी जलउत्सव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी व्यासपीठावर मविप्र संचलित आर्किटेक्ट महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. प्राजक्ता बस्ते, लोकमत सरपंच अवॉर्ड विजेत्या गीतांजली आव्हाड, जलबचतीचा संदेश देण्याचा विश्वविक्रम करणारी सृष्टी नेरकर, डॉ. उमेश मराठे, लोकमतचे सहायक उपाध्यक्ष बी. बी. चांडक, तसेच निवासी संपादक किरण अग्रवाल उपस्थित होते.याप्रसंगी प्राचार्य बस्ते यांनी सांगितले की, एकीकडे शहरात पाण्याचा अमर्याद वापर होत असताना ग्रामीण भागात अनेक ठिकाणी मात्र महिलांना कळशीभर पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागते. आपण सर्वांनी त्यामुळे जलसंपत्तीकडे जबाबदारी आणि कर्तव्य भावनेने बघितले पाहिजे. गीतांजली आव्हाड म्हणाल्या की, जल है तो कल है, ही बाब लक्षात घेता महिलांनी पाणी बचतीसाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे. आपल्या मजले चिंचोली या गावात चार-पाच वर्षांपूर्वी पाणीटंचाई ही मोठी समस्या होती, परंतु जलयुक्त शिवार योजना, जलस्त्रोताचे नियोजन, पाणी फाउंडेशन आदींसह शासनाच्या विविध योजनांच्या सहाय्याने लोकसहभागातून गाव पाणीदार बनविण्यासाठी प्रयत्न केल्याचेही त्यांनी सांगितले. याप्रसंगी जलबचतीसाठी विविध ठिकाणी प्रबोधन करणाऱ्या सृष्टी नेरकर हिनेदेखील दृकश्राव्य माध्यमातून पाणीबचतीचे महत्त्व महिलांंसह उपस्थिताना पटवून दिले.यावेळी किरण अग्रवाल यांनीही जलबचतीचे महत्त्व सांगितले. बी. बी. चांडक यांनी प्रास्ताविकात रिन आणि लोकमत प्रस्तुत ‘जलउत्सव’ या कार्यक्रमाची माहिती दिली.