शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
2
आजचे राशीभविष्य, १६ डिसेंबर २०२५: सरकारी कामात यश, अचानक धनलाभ; सुखाचा दिवस
3
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
4
क्रिकेटवेड्या देशाने मेस्सीवर जीव टाकला... पुढे? भारतीय फुटबॉलच्या विकासासाठी काय?
5
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
6
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
7
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
8
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
9
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
10
सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला-उत्तर कमी, गुंता अधिक! न्यायालयीन सल्ल्यामुळे राजकीय अनिश्चितता वाढली
11
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
12
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
13
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
14
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
15
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
16
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
17
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
18
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
19
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
20
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

गणेशोत्सवाची आरास शोधण्यासाठी मंडळांची भटकंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 00:26 IST

नाशिक शहर  परिसरात हातावर मोजण्याइतकेच गणेशोत्सवातील देखावे, आरास बनविणारे मूर्तिकार राहिल्याने सार्वजनिक मंडळांना परजिल्ह्यात देखावे, आरास घेण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. दरवर्षी गणेशोत्सव साजरा करणे खर्चिक होऊ लागल्याने सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करणाऱ्या मंडळांची संख्या दरवर्षी कमी होऊ लागली आहे.

नाशिकरोड : नाशिक शहर  परिसरात हातावर मोजण्याइतकेच गणेशोत्सवातील देखावे, आरास बनविणारे मूर्तिकार राहिल्याने सार्वजनिक मंडळांना परजिल्ह्यात देखावे, आरास घेण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. दरवर्षी गणेशोत्सव साजरा करणे खर्चिक होऊ लागल्याने सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करणाऱ्या मंडळांची संख्या दरवर्षी कमी होऊ लागली आहे.नाशिक शहरातील जुने नाशिक, पंचवटी, नाशिकरोड आदी भागांमध्ये काही वर्षांपूर्वी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची संख्या मोठ्या प्रमाणात होती. तेव्हा भोईर, लोंढे, तांबट, गर्गे, नाशिकरोडला चंदू भावसार आदी मूर्तिकार मंडळांची आरास, देखाव्यांची गरज भागवत होते. गणेशोत्सवाच्या दहा दिवस देखावे सादर केल्यानंतर मित्रमंडळांकडून सदरचे देखावे वर्षभर सांभाळून ठेवले जात व पुढच्या वर्षी त्याची रंगरंगोटी करून एकतर दुसºया मंडळाला वापरण्यासाठी देत किंवा त्याची कमी-अधिक पैशात विक्री केली जात होती. परंतु अलीकडे शहराच्या वाढत्या विस्ताराबरोबर जुन्या मंडळांना त्यांची पूर्वापार असलेली गणेशोत्सवाची जागाच राहिली नाही. त्यातच वर्गणीची रक्कम पाहिजे त्या प्रमाणात जमा होत नसल्याने गणेशोत्सव मंडळांचे आर्थिक नियोजन कोलमडून पडू लागले. परिणामी गणेशोत्सव साजरा करण्यात मंडळांना अनेक अडथळ्यांना तोंड द्यावे लागते, त्यामुळे अनेक सार्वजनिक मंडळांनी गणेशोत्सव साजरा न करण्याचे ठरविले. याशिवाय मंडळांना आर्थिक हातभार लावणारी ‘नाल’ पोलिसांकडून बंद करण्यात आल्याने काही मंडळांनी कायमचेच थांबून घेतले.अशाही परिस्थितीत शहरातील काही मंडळांनी आपली गणेशोत्सवाची परंपरा टिकवून ठेवली. छोट्या-मोठ्या प्रमाणत का होईना त्या मंडळांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू ठेवला आहे. मात्र गेल्या काही वर्षांत नाशिक शहरात सुरेश भोईर, निनाद भोईर, चंदू भावसार व सिडकोमध्ये असलेले मूर्तिकार असे बोटावर मोजण्याइतकेच मूर्तिकार शिल्लक राहिल्याने शहरातील मंडळांना देखावे, आरास घेण्यासाठी परजिल्ह्यात भटकंती करण्याची वेळ आली आहे. आरास, देखावे मिळत नसल्याने काही मंडळांकडून आकर्षक मंडप व मोठी गणेशमूर्ती आणून गणेशोत्सव साजरा करण्यावर भर दिला जात आहे. यामुळे गणेशोत्सवातून दिला जाणारा सामाजिक, धार्मिक, देशभक्ती आदी प्रकारचा संदेश लोप पावत चालला आहे.शहरातील मूर्तिकार कलाकारांकडे जागेची आर्थिक अडचणी सोबत सर्वांत महत्त्वाचे कारागिरांची अडचण नेहमीच राहिल्याने नाशिक शहरात हा व्यवसाय गणपती, नवरात्री या उत्सवापुरताच मर्यादित राहिला. वर्षभर व्यवसायाचे नियोजन करणे विविध कारणामुळे अडचणीचे ठरल्याने अनेक मूर्तिकार, कलाकारांनी या व्यवसायातून काढता पाय घेतला किंवा देखावे, आरास बनविणे बंद करून टाकले. यामुळे शहरातील मंडळांना गणेशोत्सवासाठी आरास, देखावे, मोठ्या गणपतीच्या मूर्त्या घेण्यासाठी मुंबई, ठाणे, उल्हासनगर, कल्याण, पुणे, नगर, उरळीकांचन आदी भागात भटकंती करावी लागत आहे.फायबरमधील देखावे, आरासला मागणीमुंबई, ठाणे, कल्याण, पुणे, नगर आदी भागांतील व्यावसायिक मूर्तिकारांनी फायबर मोल्ंिडगमध्ये भव्यदिव्य देखावे, आरास, मोठ्या मूर्ती बनविल्या आहेत. मूर्तींचे वेगवेगळे भाग बनवून आरास, देखावे, मोठ्या मूर्ती बनविल्याने ते पुन्हा ठेवणे सोपे जाते. फायबर मोल्ंिडगमध्ये बनविल्याने त्यांना आयुष्यदेखील मोठे आहे. व्यवस्थित तांत्रिक मदत घेऊन बनविलेले देखावे, आरास, मूर्ती खर्चिक असली तरी ती अनेक वर्षे टिकत असल्याने व्यावसायिक मूर्तिकारांना आर्थिक फायदादेखील होत आहे. त्यामुळे बहुतांश सार्वजनिक मंडळे भाडेतत्त्वावर देखावे, आरास घेतात. शहरातील बहुतांश मंडळांचा परजिल्ह्यातून देखावे, आरास आणण्यावर भर आहे.४गणेशोत्सव साजरा करण्यात मंडळांना अनेक अडथळ्यांना तोंड द्यावे लागते, त्यामुळे अनेक सार्वजनिक मंडळांनी गणेशोत्सव साजरा न करण्याचे ठरविले. याशिवाय मंडळांना आर्थिक हातभार लावणारी ‘नाल’ पोलिसांकडून बंद करण्यात आल्याने काही मंडळांनी कायमचेच थांबून घेतले.वडील नेताजी भोईर यांनी नफा-तोटा न बघता मूर्तिकार म्हणून देखावे, आरास, मूर्ती बनविण्याचे काम केले. पारंपरिक व्यवसाय असल्यामुळेच त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून पैसे कमविणे हे उद्दिष्ट न ठेवता काम करत आहे. व्यावसायिक मूर्तिकार न होता आजही देखावे, आरास, मूर्ती बनविण्याचे काम सुरू ठेवले आहे.- सुरेश नेताजी भोईर, मूर्तिकार, पंचवटीदेखावे, आरास, मोठ्या मूर्ती बनविल्यावर त्या कष्टाप्रमाणे पैसे मिळत नाही. सर्वांत मोठी अडचण कारागिरांची आहे. काही आरास, देखाव्याचे पूर्ण पैसे मंडळाकडून मिळाले नाही. जागा व आर्थिक पाठबळाचीदेखील अडचण या सर्व बाबींचा विचार करून दहा वर्षांपूर्वीच आरास, देखावे बनविण्याचे काम बंद करून मूर्तिकार म्हणून काम करत आहे.- संजय तुळशीराम घुले, मूर्तिकार, इंदू लॉन्स,औरंगाबादरोड

टॅग्स :Ganpati Festivalगणेशोत्सवNashikनाशिक