शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
2
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
3
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
4
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
5
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
6
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
7
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
8
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
9
मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण: हिंदू पक्षाला झटका, शाही ईदगाहला वादग्रस्त ढाचा घोषित करण्याची मागणी HC नं फेटाळली
10
ENG vs IND : जलद शतकी खेळीसह Jamie Smith चा पराक्रम! १४८ वर्षांत असं पहिल्यांदा घडलं
11
'रामायण'मध्ये दिग्गज कलाकारांची फौज रावणावर तुटून पडणार, अमिताभसह कोण साकारणार कोणती भूमिका?
12
'बिहार की बेटी', PM मोदींनी उल्लेख केलेल्या त्रिनिदादच्या पंतप्रधान कोण? बिहारशी काय संबंध?
13
एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीसांनी घेतले शरद पवारांचे नाव
14
Video: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्र' पाठोपाठ 'जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद...
15
इन्फेक्शन झाले म्हणून २८ वर्षांचा तरुण डॉक्टरकडे गेला, त्याने प्रायव्हेट पार्टच कापून टाकला...
16
Sanjay Raut : "अमित शाह यांच्या डुप्लिकेट शिवसेनेचं खरं रूप...", संजय राऊतांचं एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र
17
कडक सॅल्यूट! ऐकता, बोलता, पाहता येत नाही; कठोर परिश्रमाने मिळवली सरकारी नोकरी
18
“आता काय, राज तुमच्यात येणार, तुमची पॉवर वाढणार”; शिंदेंच्या मंत्र्यांची ठाकरे गटाला कोपरखळी
19
“‘लाडकी बहीण’साठी आम्ही ४१० कोटींचा निधी देतो, पण अजितदादांनी कबूल केले की...”: संजय शिरसाट

विद्या घेऊनी ज्ञान वाढवू शिकू नीतिधर्म...

By admin | Updated: January 3, 2017 23:02 IST

सावित्रीबाई फुले जयंती : विविध संस्था, संघटनांतर्फे क्रांतिज्योतीच्या कार्याचे स्मरण

नाशिक : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्ताने जिल्ह्यात विविध शाळा, संस्था, संघटना आणि मित्रमंडळांच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ठिकठिकाणी प्रतिमापूजन करण्यात आले, तर महिलांसाठी अनेक उपक्रम राबविण्यात आले. जिल्हा परिषद मराठी शाळानामपूर : येथील जिल्हा परिषद मराठी शाळेत सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. सरपंच निंबा सोनवणे, शालेय समिती अध्यक्ष विनोद पाटील व ग्रामसेवक धीरज कापडणीस यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून तंटामुक्तचे अध्यक्ष राजाराम पाटील, नंदलाल अहिरे, ग्रा. पं. सदस्य कुसूम अहिरे, सिंधूबाई पाटील, मीना अहिरे, कविता अहिरे उपस्थित होते. शिक्षक माधुरी पारमवार यांनी सावित्रीबार्इंचा जीवनपट उलगडला. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन मुख्याध्यापक सुनीता गोलाईत यांनी केले. यावेळी पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.अलई विद्यालयनामपूर : येथील रा. मु. अलई माध्यमिक विद्यालयात स्त्री शिक्षणाच्या जनक सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष मुरलीधर अलई उपस्थित होते. ज्येष्ठ शिक्षक राजेंद्र पितृभक्त यांनी प्रास्ताविक केले. शिक्षक पंडित धांडे, विनोद भदाणे, नूतन पाटील व प्रकाश अहिरे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या कार्याची माहिती दिली. दरम्यान, जागतिक धूम्रपान व बालिका दिन साजरा करण्यात आला. सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी कार्यक्रमासाठी उपस्थित होते.बीडकर विद्यालयात  अवतरल्या सावित्रीच्या लेकीपेठ : तालुक्यातील विविध शाळा, महाविद्यालये तसेच विविध शैक्षणिक संस्थांमध्ये क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी विविध कार्यक्रम घेण्यात आले.येथील दादासाहेब बीडकर इंग्लिश मीडिअम स्कूलमध्ये लीडर डे साजरा करण्यात आला. चिमुकल्या बालिकांनी सावित्रीबाई फुले, झाशीची राणी, कल्पना चावला आदिंच्या वेशभूषा केल्या होत्या. सजवलेल्या घोड्यांवरून या विद्यार्थिनींची मिरवणूक काढण्यात आली. तालुक्यातील विविध शाळांमध्ये प्रतिमापूजन, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये लेक शिकवा अभियानास सुरुवात करण्यात आली. तसेच सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावरील पुस्तकांचे प्रदर्शनही भरविण्यात आले होते.