शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड! आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस एकाच वेळी एकाच हॉटेलमध्ये, बंद दाराआड चर्चा?
2
लोकसभेत दारुण पराभव, मग विधानसभेत दमदार 'कमबॅक' कसा? महायुतीच्या नेत्याने सांगितलं गुपित
3
धक्कादायक बातमी! बुधवार पेठेतून ५ बांगलादेशी महिलांना पकडले; देशात होते अवैध वास्तव्य
4
रत्नागिरी: आरेवारे येथे लाटांचा अंदाज न आल्याने समुद्रात बुडून तीन बहिणींसह चौघांचा मृत्यू
5
बाबा ताजुद्दीन उरूस: नागपूर रेल्वे स्थानकावर कडेकोट बंदोबस्त; सुरक्षा यंत्रणा, प्रशासन सज्ज
6
महापालिका उमेदवारीची सर्वाधिक स्पर्धा भाजपमध्ये; आताच ५०० पेक्षा अधिक इच्छुकांची यादी तयार
7
पडळकरांना सभागृहात एक दिवस न बोलण्याची शिक्षा दिल्याने त्यांच्यात सुधारणा - नीलम गोऱ्हे
8
"असले राजकीय स्टंट सहन करणार नाही, माफी मागा"; राज ठाकरेंच्या वक्तव्याने गुजरातमध्ये संताप
9
आधी 'जिथं तू तिथं मी...' आता एकमेकांना अनफॉलो करत हार्दिक-जास्मिन यांच्यातील प्रेमाचा खेळ संपला!
10
वहिनीच्या अवतीभवती फिरायचा दीर, 'त्या' दिवशी हाताला धरून तिला घरी आणलं अन् कहरच केला...
11
Porsche Cayenne: पोर्शे केयेन ब्लॅक एडिशन भारतात लॉन्च; किंमत सर्वसामन्यांच्या आवाक्याबाहेर!
12
'बिहारमध्ये वीजच नाही तर बिल कुठून येणार'; नितीश कुमारांच्या घोषणेची भाजप मंत्र्याने उडवली खिल्ली
13
IND vs ENG : बुमराह 'ऑन ड्यूटी'; सिराजला मिळणार सुट्टी! टीम इंडियात शिजतोय हा प्लॅन
14
'कोल्डप्ले' कॉन्सर्टमध्ये CEO आणि HRचं अफेअर झालं उघड, आता कंपनीने केली 'ही' कारवाई
15
Electric Scooter: ओला, टीव्हीएस, बजाजसाठी धोक्याची घंटा, बाजारात येतेय रेट्रो स्टाईल इलेक्ट्रीक स्कूटर!
16
सुंदरा मनामध्ये भरली... फ्रान्समध्ये दिसला सारा तेंडुलकरचा नवा लूक, चाहतेही झाले फिदा
17
विनयभंगाच्या गुन्ह्याखाली तरुंगात गेला; सुटून आल्यानंतर पीडिताच्या घरासमोरच फोडले फटाके!
18
"...मग नितेश राणे सरकारमध्ये बसून फक्त पंखा हलवणार का?"; मनसे नेत्याचा खोचक सवाल
19
Rohini Khadse : "अरे कुणाला मूर्ख बनवता? पोलीस सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचताहेत...”, रोहिणी खडसेंचा संताप
20
सुनेवर होती वाकडी नजर, सतत मुलाशी भांडण अन् एके दिवशी सासऱ्याने टोकच गाठलं...

ज्येष्ठ विचारवंत वसंत पळशीकर यांचे निधन

By admin | Updated: October 30, 2016 01:37 IST

ज्येष्ठ विचारवंत वसंत पळशीकर यांचे निधन

नाशिक : महाराष्ट्राच्या वैचारिक जडणघडणीत महत्त्वाचे योगदान देणारे ज्येष्ठ विचारवंत व लेखक वसंत पळशीकर यांचे शनिवारी (दि.२९) पहाटे दीर्घ आजाराने निधन झाले. ते ८० वर्षांचे होते. येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात मुलगा माधव पळशीकर व परिवार आहे.वसंत पळशीकर १२ वर्षांपासून अर्धांगवायूने आजारी होते. या आजारपणातच त्यांचे निधन झाले. पळशीकर यांनी समाज प्रबोधन पत्रिका व नवभारत नियतकालिकांचे संपादकपदही भूषविले. लोकशाही, समाजवाद व त्या अनुषंगाने येणाऱ्या विविध विषयांवर सुमारे सातशे दीर्घलेखांसह त्यांनी विस्तृत लेखन केले. मार्क्सवाद, समाजवाद, फुले-आंबेडकर विचारांच्या भूमिकांची त्यांनी केलेली अभ्यासपूर्ण मांडणी अनेकांना वेगळी दृष्टी देणारी ठरली. त्यांच्या निधनामुळे एक स्वतंत्र विचार करणारा व करायला लावणारा मार्गदर्शक हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. पळशीकर यांचा जन्म हैदराबादमध्ये १९३६ मध्ये झाला होता. महात्मा गांधींच्या चळवळीतील वडिलांच्या संस्कारात ते वाढले. इंटरनंतर शिक्षण सोडून ते सामाजिक कार्याकडे वळले. गांधींजींच्या विचारांचा चिकित्सक स्वीकार त्यांनी केला. आचार्य विनोबा भावे, अण्णासाहेब सहस्रबुद्धे, साने गुरु जी, अच्युतराव पटवर्धन, बाबा आमटे अशा दिग्गजांचा त्यांना सहवास लाभला. त्यांचा मित्रपरिवारही भारतभर होता. भालचंद्र नेमाडे, भोळेसर यांच्यासह लहानथोर कार्यकर्त्यांचा त्यांच्या मित्र परिवारात समावेश आहे. भूदान आंदोलन, आनंदवन, ओरिसातील कोरापूर येथे सर्वसेवा संघाच्या कामात त्यांचा सक्रि य सहभाग होता. सन १९५९ मध्ये ते महाराष्ट्रात परतले आणि प्रबोधनाच्या कामाला त्यांनी स्वत:ला वाहून घेतले. कार्यकर्त्यांची शिबिरे, वैचारिक परिषदा - संमेलने यात त्यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले. देशभरातील परिवर्तनवादी गट, प्रयोगशील संस्थांना त्यांची मांडणी नेहमीच मार्गदर्शक ठरली. संथ आणि शांत शैली, पण ठाम युक्तिवाद हे त्यांचे वैशिष्ट होते. त्यांच्या पार्थिवावर अमरधाम येथील डिझेल दाहिनीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)पळशीकर यांची साहित्यसंपदावसंत पळशीकर यांच्या साहित्यसंपदेत सत्याग्रही सॉक्रेटिसचे वीरमरण, जमातवाद, धर्म, धर्मश्रद्धा आणि अंधश्रद्धा ही वैचारिक पुस्तके आहेत. बी. आर. नंदा लिखित गोपाळ कृष्ण गोखले यांच्या चरित्राचा व थिओडोर शुल्टझ यांच्या शेतीविषयक पुस्तकाचा अनुवाद त्यांनी केला. सोविएत रशियाची पन्नास वर्षे खंड १ व २ आणि मे. पुं. रेगे यांचा लेखसंग्रह विवेकवाद, विज्ञान आणि श्रद्धाचे त्यांनी संपादन केले आहे.