शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
2
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
3
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
4
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
5
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
6
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
7
Video - एक, दोन नव्हे तर चोरांची अख्खी गँगच; काही सेकंदात खिशातून लंपास केला फोन अन्...
8
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
9
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
10
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
11
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
12
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
13
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
14
Astro Tips: जे पुरुष घरात झाडूने साफसफाई करतात, ते झटपट श्रीमंत होतात; कसे ते पहा!
15
नालासोपाऱ्यात मेफेड्रोन ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त, तुळींज पोलिसांची प्रगतीनगर परिसरात कारवाई
16
Virat Kohli: विराट कोहलीची जर्सी खरेदी करण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चाहत्यांची झुंबड, व्हिडीओ होतोय व्हायरल!
17
पाकिस्तानविरुद्धच्या संघर्षादरम्यान या पिल्लांना सरकारने दिली झेड प्लस सुरक्षा, ७०० किमी दूर केली रवानगी
18
कॅन्सरसोबत झुंज ठरली अपयशी! ४४ वर्षीय प्रसिद्ध गायिकेचं निधन, चाहत्यांनी व्यक्त केली हळहळ
19
अरे बापरे! एका छोट्याशा चुकीमुळे होऊ शकतो प्रेशर कुकरचा भीषण स्फोट; सेफ्टीसाठी 'हे' करा
20
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू

बोगस बियाणे, खतविक्रेत्यांविरोधात अजामीनपात्र गुन्हे : गिरीश महाजन

By admin | Updated: May 10, 2015 00:12 IST

बोगस बियाणे, खतविक्रेत्यांविरोधात अजामीनपात्र गुन्हे : गिरीश महाजन

नाशिक : अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे उद्ध्वस्त झालेला शेतकरी बोगस बियाणे व खतविक्रेत्यांच्या विळख्यात सापडला आहे़ शेतकऱ्यांना चांगल्या प्रतीचे बियाणे मिळावे यासाठी शासन प्रयत्नशील असून, बोगस बियाणे, खते व कीटकनाशके विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर अजामीनपात्र गुन्हे दाखल करून कडक कारवाई करण्याचे निर्देश जलसंपदामंत्री तथा पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिले़ जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनमध्ये आगामी वर्षाच्या जिल्हास्तरीय खरीप आढावा बैठकीत ते बोलत होते. महाजन पुढे म्हणाले की, अवकाळी पाऊस, गारपीट या नैसर्गिक आपत्तीमुळे एकरी लाखो रुपये खर्च करून उभे केलेले पीक मातीमोल होत असून, यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे़ तसेच पीकविमा योजनेतून मिळणारी मदतही तोकडी ठरत असून, यासाठी नवीन पीक विमा योजना आणण्याचा शासनाचा प्रयत्न आहे़ गतवर्षी कन्नड व जालना येथून आणलेली कांद्याची बियाणे बोगस निघाले़ केवळ कांदाच नव्हे, तर तूर, सोयाबीन, कापूस यांची बियाणेही खराब निघाली, ही झाडे तर जोमाने वाढली मात्र त्यास फळच आले नाही़ बोगस बियाणांचा संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांना फटका बसला असून, अशा विक्रेत्यांवर कडक कारवाई व्हावी यासाठी कायद्यात बदल करण्याबाबत विचार सुरू आहे़शाश्वत व सुरक्षित शेतीस सरकार प्राधान्य देणार आहे़ यासाठी शेतकऱ्यांना शेडनेट, ठिबक सिंचन यासाठी कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे़ तसेच शेडनेट कमी दरात मिळावे यासाठी राज्यातीलच दोन कंपन्यांशी बोलणे सुरू आहे़ तसेच शेडनेटवरील आयातकर कमी करणे, शेडनेटसाठी घेतलेल्या कर्जावरील व्याज भरण्याचा राज्य सरकारचा निर्णयही अंतिम टप्प्यात आहे.राज्याला दुष्काळ व टंचाईतून मुक्त करण्यासाठी शासन ‘जलयुक्त शिवार अभियान’ ही क्र ांतिकारी योजना राबवित आहे. पाण्याचा अतिवापराने मातीचा पोत खराब होतो त्यामुळे ठिबक सिंचनातून कमी पाण्याद्वारे अधिक उत्पादन घेण्यासाठी जनजागृती केली जाणार असल्याचेही महाजन यांनी सांगितले़ यावेळी त्यांच्या हस्ते या अभियानाच्या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.यावेळी बैठकीस आमदार डॉ. राहुल अहेर, बाळासाहेब सानप, नरहरी झिरवाळ, राजाभाऊ वाजे, दीपिका चव्हाण, जिल्हा परिषद अध्यक्ष विजयश्री चुंभळे, विभागीय आयुक्त एकनाथ डवले, जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर, विभागीय कृषी सहसंचालक कैलास मोते, जिल्हा परिषद, कृषी, महसूल या विभागांचे अधिकारी उपस्थित होते.(प्रतिनिधी) —ठळक—* पीकविमा योजनेतील निकषांमध्ये लवकरच बदल.* शाश्वत व संरक्षित शेतीसाठी शेडनेटच्या व ठिबकसाठी कर्ज व प्रोत्साहन.* बोगस बियाणे विक्रेत्यांवर कडक कारवाई.* प्रत्यक्ष शेतावर जाऊन नुकसानीचे पंचनामे व त्यानुसार भरपाईचे अध्यादेश.* शेडनेट उत्पादनासाठी उद्योगपतींशी चर्चा.