शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

दोन गावे, एका वाडीला टॅँकर

By admin | Updated: April 25, 2017 01:47 IST

चांदवड : तालुक्यातील परसूल, हिरापूर (दरसवाडी) व नांदुरटेक येथील चिंचबारी वस्तीवरील ग्रामस्थांच्या मागणीनुसार तेथे शासकीय टॅँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.

चांदवड : तालुक्यातील परसूल, हिरापूर (दरसवाडी) व नांदुरटेक येथील चिंचबारी वस्तीवरील ग्रामस्थांच्या मागणीनुसार तेथे शासकीय टॅँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आल्याची माहिती तहसीलदार डॉ. शरद मंडलिक व पंचायत समिती पाणीपुरवठा विभागाचे सी. जी. मोरे यांनी दिली. तालुक्यात जलयुक्त शिवार योजनेची कामे बऱ्यापैकी झाल्याने तालुक्याला यंदा उशिरा एप्रिल महिन्याच्या शेवटी शेवटी पाणीटंचाई जाणवू लागली आहे. तालुक्यातील सुमारे ७० गावांना ओझरखेड धरणावरील नळ योजनेद्वारे, तर १६ गावांना नाग्यासाक्या धरणातून पाणीपुरवठा केला जात आहे. दरम्यान, मे महिन्यात उन्हाची तीव्रता वाढल्यास पाणी पातळी घटेल तेव्हा टॅँकरच्या संख्येत वाढ होण्याची शक्तता प्रशासनाने वर्तवली आहे. ज्या गावांकडून पाण्याच्या टॅँकरची मागणी येते त्या गावांचा तहसीलदार, गटविकास अधिकारी, उपअभियंता संयुक्त पाहणी दौरा करतात. त्यांनी टॅँकर सुरू करण्याचा अहवाल दिल्यानंतरच, जिल्हाधिकारी यांच्या परवानगीने तेथे टॅँकर सुरू करण्यात येतो, असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. (वार्ताहर)