शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधी खासदारांचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर मोर्चा, पोलिसांनी अनेकांना घेतले ताब्यात...
2
मेवाड-जैसलमेर-बूंदी...! राजस्थानला मराठा साम्राज्याचा नकाशा खुपू लागला; एनसीईआरटीच्या पुस्तकावरून वाद
3
श्रावण सोमवारी दु:खाचा डोंगर; पाथरीत कावड यात्रेत कार घुसली, दोन भाविकांचा जागीच मृत्यू
4
भारताला 'डेड इकॉनॉमी' म्हणणाऱ्या ट्रम्प यांचा 'डॉलर'च धोक्यात; एक्सपर्टनं दिला मोठा इशारा
5
इस्रायलने पत्रकारांच्या छावणीवर हल्ला केला; अल-जझीराचे पाच पत्रकार ठार, आयडीएफ म्हणतेय...
6
पुन्हा जिवंत करण्यासाठी तरुणाचा मृतदेह ५ दिवस पाण्यात ठेवला अन् बाजूला बँड वाजवत बसले! कुठे घडला 'हा' प्रकार?
7
१५ महिन्यांच्या चिमुकल्याला ढकलले, मारले आणि मग..., डे-केअर सेंटरमधील धक्कादायक प्रकार
8
"भारत चकचकित मर्सिडीज, पाकिस्तान कचऱ्यानं भरलेला ट्रक", फील्ड मार्शल आसिम मुनीर यांनी PAK ची अब्रू वेशीवर टांगली!
9
कोण म्हणतोय प्रेमात धोका... भारतीय सुधारले; २ वर्षांत १६% कमी झाले, नात्यात हे निवडू लागले...
10
Shravan Somvar 2025: शिवलिंगावर अभिषेक करताना तुम्हीसुद्धा 'ही' चूक करताय का? पूजा राहील अपूर्ण!
11
सरकार बँक ऑफ महाराष्ट्र-LIC सह 'या' ५ बँकांमधील हिस्सा विकणार, गुंतवणूकदारांना काय फायदा?
12
दिलदार! भीक मागून १.८३ लाख जमवले, मंदिरासाठी दान केले; रंगम्माच्या मनाचा मोठेपणा
13
Donald Trump Tariff on India: डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर सरकारचा प्लान तयार, आता देणार ‘जशास तसं’ उत्तर
14
मंगळवारी श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: चंद्रोदय कधी आहे? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, मान्यता
15
रुग्णवाहिकेचा भीषण अपघात; पतीचा मृतदेह घेऊन जाणाऱ्या पत्नीचा दुर्दैवी अंत
16
भावाचा जीव वाचवण्यासाठी गेलेल्या बहिणीलाच मृत्यूने कवटाळलं; रक्षाबंधनच्या दिवशीच कुटुंबावर शोककळा
17
श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: धन-धान्य-ऐश्वर्य लाभेल, ‘हे’ उपाय अवश्य करा; गणपती शुभच करेल!
18
निम्म्यापेक्षाही अधिक घसरण, ५ दिवसांत ४०% नं घसरला हा मल्टिबॅगर शेअर; तुमच्याकडे आहे का?
19
फक्त १०,००० रुपये गुंतवून जमा होईल ३ कोटी रुपयांचा फंड! १०:१२:३० चा फॉर्म्युला असा करतो काम
20
कीबोर्डच्या F आणि J बटणांवर लहान रेषा का असतात? ९९ टक्के लोक अज्ञात असतील...

ओझरला रंगणार तिरंगी सामना

By admin | Updated: February 16, 2017 00:16 IST

चुरस : शिवसेनेच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे लक्ष

सुदर्शन सारडा  ओझरओझर गटाने यंदा सर्वांनाच मोठा धक्का दिला आहे. वीस वर्षांपासून ताब्यात असलेल्या ओझर गटात यंदा शिवसेनेला उमेदवार मिळाला नसल्याने यंदा गटावर भगवा फडकणार नाही. निवडणुकीमधून सेनेची एक्झीट हीच गोष्ट अचंबित करणारी ठरली असली तरी राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा आणि नागरिक आघाडी यांनी कंबर कसल्याने आता सामना तिरंगी होणार हे स्पष्ट झाले आहे. ऐनवेळी शिवसेना नेमकी काय भूमिका घेते, याकडे सर्वपक्षीयांचे लक्ष लागून आहे.दोन्ही काँग्रेसमध्ये आघाडी झाली असून, राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे गटामध्ये मर्चंट बँकेचे संचालक माजी सरपंच राजेंद्र शिंदे, तर काँग्रेसकडून ओझर गणामध्ये किरण दोंदे आणि टाउनशिप गणात माजी सरपंच हेमंत जाधव हे रिंगणात आहेत, तर ग्रामपंचायतीमध्ये सत्ता असलेल्या नागरिक आघाडीकडून ग्रामपंचायत सदस्य यतीन कदम हे रिंगणात आहेत. तसेच ओझर गणात नितीन पवार व टाउनशिप गणात नितीन जाधव हे रिंगणात आहेत.गटात भाजपाकडून शिक्षक असलेले रमेश त्र्यंबक कदम, तर गणात दीपक श्रीखंडे व टाउनशिप गणात राजेंद्र दोंदे रिंगणात आहेत. ओझर गणात अपक्ष म्हणून योगेंद्र दांडेकर, तर बसपाकडून प्रकाश चौधरी हे उमेदवारी करीत आहेत. ओझर-टाउनशिप गणात बसपाकडून ग्रामपंचायत सदस्य असलेले धर्मेंद्र जाधव आहेत तर मनोज पांडव अपक्ष आहेत. गट ओबीसी आरक्षित झाल्याने सुरुवातीपासून इच्छुकांनी जमेल त्या मार्गाने मतदारांना आकर्षित केले असले तरी कोण किती मते घेतो यावर विजयाचे गणित असेल. ओझर गटामध्ये राजेंद्र शिंदे यांनी सरपंचपद उपभोगले असून, गावातील व उपनगरातील अंतर्गत रस्ते काँक्रिटीकरण व अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा पाइपलाइनचे तसेच इतर कामे केली आहेत. यतीन कदम यांनी गावातील अतिक्रमणे तसेच एचएएलकडून भेटलेल्या निधीतून गावातील मुख्य रस्त्यांचे रुंदीकरण करून डांबरीकरण केले, यासह इतर कामे ही त्यांनी केली आहेत. रमेश कदम यांच्याकडेदेखील ग्रामपंचायत निवडणूक लढवण्याचा अनुभव आहे.