शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित शर्मा रुग्णालयात; 'हिटमॅन'ला अचानक काय झालं? Viral Video मुळे फॅन्स चिंतेत
2
Tariff: अमेरिकेच्या टॅरिफवर भारताचा तोडगा! शेती व दुग्धव्यवसाय क्षेत्र खुले करण्यास दिला ठाम नकार
3
कुर्डूतील मुरुम उपसा बेकायदाच, IPS अंजना कृष्णा यांनी केलेली कारवाई योग्य; जिल्हाधिकाऱ्यांनीच सांगितलं सत्य
4
अमेरिकेतील दुकानात चोरी करताना पकडली गेली गुजराती महिला? चौकशीवेळी ढसाढसा रडू लागली, त्यानंतर...
5
सी. पी. राधाकृष्णन की बी. सुदर्शन रेड्डी, भारताचे १५ वे उपराष्ट्रपती कोण होणार? आज निवडणूक
6
GEN-Z च्या आंदोलनापुढे नेपाळ सरकार झुकले; सोशल मीडियावरील बंदी उठवली
7
केंद्र सरकारने रोखले पीएम किसानचे मानधन; दोघांच्या नावे शेती असल्यास पत्नीलाच मिळेल लाभ
8
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५, नशिबाची साथ लाभेल, परदेशातून शुभ समाचार मिळतील
9
अग्रलेख: चिमुकल्यांच्या जिवाशी खेळ; प्रश्नांकडे दुर्लक्ष ही धोरणात्मक चूक
10
नेपाळच्या संसदेत घुसली तरुणाई, प्रचंड तोडफोड-जाळपोळ; सैन्याचा आंदोलकांवर गोळीबार
11
विशेष लेख:बिहारचे मैदान तापले; सर्वांच्या अस्तित्वाची लढाई!
12
हैदराबाद गॅझेटियरची अंमलबजावणी १७ सप्टेंबरपूर्वी करा, अन्यथा...; जरांगेंनी थोपटले दंड, ओबीसी समाज आक्रमक
13
लेख: माणूस १०० वर्षांपलीकडे आपले आयुष्य वाढवू शकतो का?
14
आधार हा नागरिकत्वाचा नाही तर ‘ओळखी’चा पुरावा; १२ वे दस्तावेज म्हणून ग्राह्य धरा, सुप्रीम कोर्टाचे निर्देश 
15
जीपच्या धडकेत तिघे ५० फूट फेकले, पती-पत्नीसह एक वर्षाचा चिमुकला ठार
16
Navratri 2025: तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्रीला १४ सप्टेंबरपासून सुरुवात
17
संयम अन् सकारात्मकतेमुळे इथवर आलो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उलगडले गुपित
18
जम्मू-काश्मीरमधील कुलगाम येथे चकमक; दोन अतिरेकी ठार
19
"सरकार झुकणार नाही, सोशल मीडियावरील बंदी हटणार नाही..."; काय म्हणाले नेपाळचे पंतप्रधान केपी ओली?
20
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!

स्वस्ताईमुळे संक्रांतीचा गोडवा

By admin | Updated: January 8, 2017 01:26 IST

समाधान : किराणा बाजारात मालाचे उतरले दर

नाशिक : चांगले पाऊसपाणी, भरपूर उत्पन्न आदि कारणांमुळे किराणा बाजारात सध्या बऱ्यापैकी भाव उतरल्याचे चित्र दिसत आहे. इतर धान्यांबरोबरच जवळच येऊन ठेपलेल्या मकरसंक्रांतीचा गोडवा वाढविणारी आनंदाची बातमी म्हणजे तिळाचे भाव दुपटीने कमी झाले असून, यंदा सर्वांना एकमेकांना गोड गोड बोलण्याच्या शुभेच्छा देताना अधिक आनंद होणार आहे.मागील वर्षी २०० ते २१५ रुपये असलेले तीळ यंदा १०० ते १२० रुपये किलो दराने मिळत आहे. त्यात गावठी तीळ १०० ते १२०, पॉलिश तीळ १४० रुपये किलो या दराने मिळत आहे. गूळ मात्र यंदा ५ ते ८ रुपयांनी महागला असून, मागील वर्षी तो ५२ रुपये किलो होता. सध्या गूळ ५८ रुपये किलो दराने बाजारात उपलब्ध आहे. साधा, चिक्कीचा गूळ पावशेर, अर्धा किलो, एक किलोच्या ढेपेत उपलब्ध आहे. गुळाबरोबरच साखरही यंदा थोडी महाग झाली आहे. मागील वर्षी ३४ ते ३५ रुपये किलो दराने मिळणारी साखर यंदा ३९ रुपये किलो दराने मिळत आहे. साखरेबरोबरच साजूक तुपाचाही भाव ४९० रुपये किलोपासून कंपन्यांप्रमाणे तुपाचे भाव बदलत आहे. पांढरा व रंगीबेरंगी हलवा २० ते ३० रुपये पावशेर दराने उपलब्ध आहे. बाजारपेठेत संक्रांतीच्या साहित्याची थोड्या प्रमाणात रेलचेल पहायला मिळत आहे. तिळगुळाचे तयार लाडू व वड्याही बाजारात दाखल झाल्या असून, अर्धा किलोच्या पॅकेटची किंमत ९० ते १०० रुपये अशी आहे. रेवड्या १४० रुपये किलो दराने उपलब्ध आहेत. मकरसंक्रांतीला मुगाची खिचडी, गूळपोळी, बाजरीच्या भाकरीचे महत्त्व असते. याशिवाय तिळाचे उटणे, तिळाचे तेल, तिळाची भाकरी केली जाते. सुगड्यातून हरबरे, गाजर, गव्हाच्या ओंब्या, उसाची कांडी, बोर आदिंचे दान दिले जाते. सध्या या साऱ्या गोष्टी अर्थात भाजीपाला, डाळी, तांदूळ, शेंगदाणे, तेल, तूप, कडधान्य साऱ्यांचे भाव बऱ्यापैकी कमी झाले असल्याने सध्या जनसामान्यांना दिलासा मिळाला आहे. त्यामुळे यंदा स्वस्ताईसह मकरसंक्रांती साजरी करण्याचा आनंद नागरिकांना मिळणार आहे.