शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
2
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
3
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे
4
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
5
इराण-इस्त्रायल युद्ध पेटले! ४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा, थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल!
6
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
7
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
8
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
9
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
10
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
11
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
12
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 
13
रणथंबोरची राणी, मगरींच्या शिकारीसाठी प्रसिद्ध; 'अ‍ॅरोहेड'ने घेतला अखेरचा श्वास...
14
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
15
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
16
जगाच्या नकाशावर नाहीसा होऊ लागलाय 'हा' सुंदर देश; शास्त्रज्ञांनाही फुटलाय घाम!
17
स्वामींच्या मठात गेल्यावर तुम्हालाही ‘या’ २ गोष्टींचा अनुभव आला आहे का? उत्तर हो असेल तर...
18
युद्धातही श्रीमंतीचा डंका! इस्रायलची सर्वात श्रीमंत महिला चर्चेत! कसं उभं केलं ५.१६ लाख कोटींचं साम्राज्य?
19
तीन वेळा पतीचा जीव घेण्याचा केला प्रयत्न; चौथ्यांदा चिकन भात खायला देत कायमचा संपवला
20
Nag Panchami 2025: यंदा नागपंचमी कधी? कालसर्प दोष निवारणासाठी 'हा' दिवस राखीव ठेवाच!

मनमाड शहरात कडकडीत बंद

By admin | Updated: June 20, 2014 21:58 IST

मनमाड : शहरात महावितरणकडून भारनियमन कायमस्वरूपी बंद करावे या मागणीसाठी व्यापारी महासंघाच्या वतीने मनमाड बंदला कडकडीत बंद पाळण्यात आला.

मनमाड : शहरात महावितरणकडून करण्यात येणाऱ्या भारनियमनामुळे व्यापारी वर्ग देशोधडीला लागण्याची वेळ आली असल्याने हे भारनियमन कायमस्वरूपी बंद करावे या मागणीसाठी व्यापारी महासंघाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या मनमाड बंदच्या आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने कडकडीत बंद पाळण्यात आला.एकात्मता चौकात सुरू करण्यात आलेल्या धरणे आंदोलनप्रसंगी वीज वितरणच्या अधिकाऱ्यांनी आंदोलकांशी केलेल्या चर्चेनंतरही तोडगा न निघाल्याने आंदोलन सुरूच होते. शहरातील विविध पक्ष व संघटनांनी या आंदोलनाला पाठिंबा देऊन सहभाग नोंदवला. सकाळी दुकान उघडत नाही तोच भारनियमन सुरू होते आणि संध्याकाळी ज्यावेळेस ग्राहक खरेदीला दुकानात येतात त्यावेळेस संध्याकाळपासून रात्रीपर्यंतचे भारनियमन करण्यात येते. याचा परिणाम व्यवसायावर होत आहे. दुकानात इन्व्हर्टर, जनरेटर ही पर्यायी सुविधा करण्यात आली असली तरी शहरात अंधाराचे साम्राज्य असल्यामुळे ग्राहक खरेदी करण्यासाठी दुकानात येत नाही. भारनियमनामुळे व्यापार करणे कठीण झाले आहे. या विरोधात आज मनमाड बंदचा इशारा शहर व्यापारी महासंघाने दिला. याबाबत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह संबंधितांना निवेदन पाठविण्यात आले. काल सायंकाळी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजाभाऊ पारीक यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातून फेरी काढून बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले.यावेळी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजाभाऊ पारीक, माजी आमदार राजाभाऊ देशमुख, नाना शिंदे, शहराध्यक्ष संतोष बळीद, नितीन पांडे, नारायण पवार, माजी नगराध्यक्ष राजाभाऊ अहिरे, गंगाभाऊ त्रिभुवन, कांतीभाऊ चोबे, प्रकाश लोढा, सलीम सोनावाला, अनिल गुंदेचा आदि उपस्थित होते. (वार्ताहर)