शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
4
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
5
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
6
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
7
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
8
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
9
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
11
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
12
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
13
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
14
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
15
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
16
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
17
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
18
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
19
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
20
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”

नोटबंदीविरोधात राष्ट्रवादीचा रास्ता रोको

By admin | Updated: January 10, 2017 00:31 IST

जिल्ह्यात बंद : कळवण, नांदगावी बस आगारातच; सुरुळीत वीजपुरवठा, कर्ज, वीजबिल माफीची मागणी

कळवण : नोटाबंदीमुळे शेतकरीवर्गा-बरोबरच सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाला असून, या निर्णयाचा निषेध करण्यासाठी जिल्ह्यात ठिंकठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे जागोजागी वाहतूक ठप्प झाली होती. सोमवारी (दि. ९) सकाळी १० वाजता कळवण बसस्थानकासमोर तासभर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलनाचे नेतृत्व जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार, मविप्रचे संचालक रवींद्र देवरे, जिल्हा बॅँक संचालक धनंजय पवार, कळवण नगरपंचायतचे गटनेते कौतिक पगार, ज्येष्ठ नेते नारायण हिरे, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेद्र भामरे यांनी केले. रास्ता रोकोमुळे वाहतूक दुतर्फा ठप्प झाली होती. शालेय विद्यार्थी, नोकरदार व प्रवासी बांधवांना या आंदोलनाचा फटका बसला. त्यामुळे एस.टी. महामंडळाच्या कळवण आगारातून एकही बस बाहेर पडली नाही. नोटाबंदीनंतर ५० दिवसांत बँकेच्या रांगेत उभे राहिलेल्यांपैकी १००हून अधिक व्यक्तींचे बळी गेले आहेत. एटीएम सेंटर बंद आहेत. बाजारपेठा ओस पडल्या आहेत. नोटाबंदीनंतर कॅशलेस प्रणाली म्हणजे जनतेची फसवणूक असल्याचे यावेळी नेत्यांनी केलेल्या भाषणात सांगितले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष राजेंद्र पवार, रायुकॉँ तालुकाध्यक्ष प्रवीण रौंदळ, महादू पाटील, विलास रौंदळ, एकनाथ पगार, डी.एम. गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले.आंदोलनप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष जितेंद्र पगार, संजय पवार, राजेंद्र पवार, प्रवीण रौंदळ, महादू पाटील, पांडुरंग पाटील, मधुकर जाधव, पंकज पाचपिंड, अमोल पगार, रामा पाटील, सुभाष शिरोडे, यशवंत देशमुख, महेंद्र हिरे, दीपक वाघ, डी.एम. गायकवाड, रवींद्र सोनवणे, जयेश पगार, राज देवरे, कृष्णा बच्छाव, भाऊसाहेब पगार, संजय वाघ, काशीनाथ देशमुख, प्रल्हाद गुंजाळ, शांताराम जाधव, आशुतोष अहेर, दीपक खैरनार, मिलिंद पगार, उमेश सोनवणे, सागर खैरनार आदिंसह तालुक्यातील नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, युवक, शेतकरी, शेतमजूर, कामगार व व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.नांदगाव : केंद्र सरकारने जाहीर केलेल्या नोटबंदीच्या विरोधात व शेतमालाला योग्य हमीभाव मिळावा यासाठी राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षातर्फे सोमवारी नांदगाव येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. देशाच्या अर्थव्यवस्थेतील काळा पैसा नष्ट करण्याच्या उद्देशाने नोटा चलनातून रद्द केल्याची घोषणा केली. परंतु एवढा महत्त्वाचा आर्थिक निर्णय घेण्याअगोदर त्यानंतर निर्माण होणाऱ्या परिस्थितीची कोणतीही पूर्वतयारी न केल्याने देशभरातील करोडो नागरिकांना प्रचंड आर्थिक ताण सोसावा लागत आहे. त्यामध्ये प्रामुख्याने शेतकरी, कष्टकरी, कामगार, सर्वसामान्य जनता व मोलमजुरी करणाऱ्यांना मोठ्या प्रमाणात सामोरे जावे लागत आहे. सर्वसामान्यांना बँकेत असलेले स्वत:चे पैसेसुद्धा मिळणे अवघड झाले आहे. गृहिणींना घर कसे चालवायचे हा प्रश्न पडला आहे. गेली चार वर्षं दुष्काळाने होरपळणारा शेतकरी या नोटबंदीमुळे व शेतमालाला योग्य बाजारभाव मिळत नसल्याने मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. या सर्व प्रश्नांवर राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षातर्फे नांदगाव येथे भारतीय स्टेट बॅँकेच्या एटीएमसमोर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे कार्यकर्ते घोषणा देत असताना एटीएमच्या रांगेत पैसे घेण्यासाठी उभे असलेल्या नागरिकांनीही घोषणा देऊन आंदोलनाला पाठिंबा दर्शविला. यावेळी बोलताना चोरांना व भ्रष्टाचाऱ्यांना मदत करून लाखो रु पये जमा करणारे सरकार त्यांनी न केलेल्या कामाच्या खोट्या जाहिराती करून जनतेची दिशाभूल करत असून, भांडवलदाराच्या हातातील बाहुले हे सरकार बनले आहे. असे तालुका अध्यक्ष संतोष गुप्ता यांनी सांगितले. यावेळी आमदार पंकज भुजबळ यांच्या संपर्क कार्यालयापासून ते भारतीय स्टेट बँकेपर्यंत मोर्चा काढून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.यावेळी संतोष गुप्ता, अरुण पाटील, राजाभाऊ पगारे, कैलास पाटील, रमेश पगार, विलास भाबड, महेंद्र गायकवाड, विश्वास अहिरे, अतुल पाटील, राजेंद्र जाधव, सुमित गुप्ता, राहुल भोपळे, सतीश अहिरे, किसन जगधने, सोपान पवार, राजेंद्र लाठे, सुदाम राठोड, संजय शिरसाठ, ज्ञानेश्वर पवार, राजेंद्र आहेर, मधुकर डफाळ, वाल्मीक टिळेकर, मुक्ताराम बागुल, हबीब शेख, इक्बाल शेख, विलास राजुले, दिनेश परांडे, पापा थोमस, सिद्धांत केदारे, पिटर फेरो, भाऊसाहेब सूर्यवंशी, भाऊसाहेब गिते, धनराज बुरकुल, तानसेन जगताप, दीपक खैरनार, प्रताप निकम, बाबासाहेब घाडगे, बाळासाहेब आहेर, सुनील शिरसाठ, बाळासाहेब मोरे, मधुकर बोरसे, रूपेश पाटील, रामदास पवार, धनंजय गोजरे, डॉ. नितीन सोनवणे आदिंसह राष्ट्रवादी कॉँग्रेसाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)