शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

त्र्यंबक पालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदी श्रीकांत गायधनी, श्यामराव गंगापूत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2018 14:56 IST

त्र्यंबकेश्वर -येथील नगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदी अ‍ॅड.श्रीकांत प्रभाकर गायधनी व शामराव माधवराव गंगापुत्र यांची नियुक्ती नगराध्यक्ष पुरु षोत्तम लोहगावकर यांनी केली.

त्र्यंबकेश्वर -येथील नगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदी अ‍ॅड.श्रीकांत प्रभाकर गायधनी व शामराव माधवराव गंगापुत्र यांची नियुक्ती नगराध्यक्ष पुरु षोत्तम लोहगावकर यांनी केली. बुधवारी बोलाविलेल्या विशेष सभेत नगराध्यक्षांनी ही घोषणा केली. आज सर्वचे सर्व म्हणजे १६ नगरसेवक, उपनगराध्य असे १८ जण उपस्थित होते. आता यापुढे पालिकेत दोन स्वीकृत नगरसेवकांसह एकुण सदस्य संख्या एकुण २० झाली आहे. या नियुक्तीचे भाजप नेते भावेश शिखरे , माधवराव भुजंग उपनगराध्यक्ष स्वप्निल शेलार, माजी गटनेते रविंद्र सोनवणे, नगरसेविका अनिता बागुल, सागर उजे, आरपीआय तालुकाध्यक्ष शांताराम बागुल, कैलास नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष राहुल फडके आदींनी स्वीकृत नगरसेवक निवडीवर मनोगत व्यक्त केले. शामराव गंगापुत्र हे शहर भाजपचे अध्यक्ष असुन त्यांनी आपल्या कार्यकाळात पक्षाचे अनेक उपक्र म राबवून पक्षकार्य वाढविले. पक्षी काम करत असतांना पालिका निवडणुक लागली. तर जिल्हा भाजपचे उपाध्यक्ष असलेले अ‍ॅड. श्रीकांत गायधनी हे व्यवसायाने वकील असुन त्यांना पालिकेच्या दैनंदिन कामाचा चांगला अनुभव आहे. गायधनी हे गावातील याज्ञवल्क्य सभागृह लोकमान्य स्मारक मोफत वाचनालय त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त अशा विविध पदांवर जबाबदारीच्या पदांवर कार्यरत आहेत. यावेळी मुख्याधिकारी डॉ.चेतना केरूरे, कार्यालयीन अधिक्षक अरूण गरु ड, संजय मिसर आदी कार्यालयीन कर्मचाºयांसह नगरसेवक कैलास चोथे, भारती बदादे, विष्णु दोबाडे , सायली शिखरे, त्रिवेणी तुंगार, अशोक घागरे, कल्पना लहांगे , दिपक गिते, माधुरी भुजंग, शितल उगले, मंगला आराधी, समीर पाटणकर, संगिता भांगरे व शिल्पा रामायणे आदी उपस्थित होते.------------------केवळ औपचारिकतानिवडणुक झाल्यानंतर नागरिकांना प्रतिक्षा होती ती स्वीकृत नगरसेवक निवडीची. पण सन १९६५ नगरपालिका अधिनियमात नवीन तरतुद करु न स्वीकृत नगरसेवक निवड ऐवजी नगराध्यक्षांनी नियुक्ती करु न करावयाची आहे. त्याप्रमाणे नगराध्यक्षांनी नियुक्ती केली आहे. विशेष म्हणजे नगरपालिकेत भाजपाला निर्विवाद एकतर्फी यश मिळाल्याने पालिकेची सुत्रे आता पक्षाच्या हाती आहेत. त्यामुळेच पक्षाकडुनच स्वीकृत नगरसेवकांची नावे बंद लिफाफ्यात आली. अर्थात ती सर्वांनाच ठाउक होती. आज फक्त नगराध्यक्षांनी औपचारिकरित्या नियुक्तीचा आदेश सभागृहात वाचून दाखविला.

टॅग्स :Nashikनाशिक