सातपूर : सातपूर विभागातील शिवसेनेच्या पराभूत उमेदवारांना पराभव चांगलाच जिव्हारी लागला असून, त्यांनी मतमोजणीस हरकत घेतली आहे. उमेदवारांसमोर फेर मतमोजणी करण्याची मागणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. महानगरपालिकेच्या सहाव्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज सातपूर येथील क्लब हाउस येथे मतमोजणी प्रक्रि या राबविण्यात आली. सकाळी दहा वाजेपासून सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत मतमोजणी घेण्यात आली. या मतमोजणीनंतर सातपूर विभागातील चार प्रभागांमध्ये भाजपाचे ८ उमेदवार विजयी झाले आहेत. तर शिवसेनेचे ५ उमेदवार आणि २ मनसेचे व एक रिपाइं असे उमेदवार विजयी झालेले आहेत. या निवडणुकीत शिवसेनेचे ११ उमेदवार पराभूत झालेले आहेत. मतदानाचा कौल पाहता मतमोजणीनंतर रात्री उशिरा शिवसेनेच्या पराभूत उमेदवारांनी निवडणूक निर्णय अधिकारी भालचंद्र बेहेरे यांची भेट घेऊन मतमोजणी प्रक्रि येला हरकत असल्याचे सांगितले. मतमोजणी उमेदवारांसमवेत किंवा तज्ज्ञ प्रतिनिधींसमोर फेर मतमोजणी करावी, अशी मागणी केली. या मागणीचे पराभूत उमेदवारांनी रीतसर निवेदन दिले आहे.
सातपूरला शिवसेना उमेदवारांना पराभव जिव्हारी
By admin | Updated: February 24, 2017 01:30 IST