शहरं
Join us  
Trending Stories
1
Local Body Elecctions Voting: राज्यातील २६४ नगरपालिका आणि नगरपंचायतींसाठी आज मतदान
2
आजचे राशीभविष्य, २ डिसेंबर २०२५: सामाजिक क्षेत्रात सफलता व कीर्तीलाभ होण्याची शक्यता
3
प्रत्येक स्मार्टफोनमध्ये सरकारचे 'संचार साथी' ॲप; इच्छा असूनही डिलीट करता येणार नाही
4
रुपयाची ९०कडे वाटचाल! रुपयाची आशियातील इतर चलनांच्या तुलनेत वर्षभरात सर्वांत खराब कामगिरी
5
यंग सायंटिस्ट अवॉर्ड ते देशद्रोही! पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या निशांत अग्रवालला जन्मठेपेऐवजी तीन वर्षे कैद
6
Local Body Elections: निवडणुका रद्द करण्यावरून आयोगावर सर्वपक्षीय संताप, पोरखेळ चालल्याची टीका
7
...तर बीकेसीतील बुलेट ट्रेन स्टेशनच्या कामाला स्थगिती, तीन दिवसांत मागितले उत्तर
8
देशातील महिलांना मिळणार विनातारण ३ लाखांपर्यंत कर्ज
9
“आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी आत्मपरीक्षणाची वेळ आली आहे”: सरसंघचालक मोहन भागवत
10
“मोदी सरकार काय लपवायचा प्रयत्न करत आहे?”; SIR वरून काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेंचा सवाल
11
नगरपरिषद निवडणुकांसाठी एकनाथ शिंदेंचा धडका, १० दिवसांत ५३ सभा; जनता कौल देईल का?
12
पुतिन यांच्या भारत दौऱ्यात सर्वात मोठ्या डीलची तयारी...! संपूर्ण जग बघत राहणार, पाकिस्तान-चीनचं टेन्शन वाढणार
13
“CM असताना अडीच तासांपेक्षा जास्त कधी झोपलो नाही, विरोधकांची झोप उडवली”: एकनाथ शिंदे
14
महापरिनिर्वाण दिन २०२५: मध्य रेल्वे अतिरिक्त विशेष लोकल सेवा चालवणार; पाहा, वेळापत्रक
15
"...तर ताबडतोब देश सोडा!", डोनाल्ड ट्रम्प यांची मादुरो यांना फोनवर थेट धमकी; अमेरिका-व्हेनेझुएला युद्ध पेटणार?
16
अंत्यविधीसाठी कुटुंब परगावी, चोरट्यांनी साधली संधी; वॉशिंग मशीनमधील दागिने-पैसे केले लंपास
17
"नॉन-व्हेज खाणारे वाईट आहेत, असं मी म्हणत नाही, पण..."; पंतप्रधान मोदी संसदेत नेमकं काय बोलले?
18
याला म्हणतात 'इंटरनॅशनल बेइज्जती'! रशियन तरुणींना कोणत्या देशाचे तरुण सर्वाधिक आवडतात? पाकिस्तानी ब्लॉगरचा VIDEO पाहून हसू आवरणार नाही!
19
VIDEO : रोहित-गंभीर यांच्यात वाद? ड्रेसिंग रुममधील व्हायरल व्हिडिओमुळे रंगली चर्चा
20
संसदेच्या हिवाळी अधिवेशनात 'वंदे मातरम्'वर 10 तास चर्चा; PM मोदी सहभागी होणार...
Daily Top 2Weekly Top 5

आनंदवली परिसरातून गोदावरी नदीत जाणारे मलजल बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:13 IST

नाशिक : गोदावरी आणि उपनद्यांचे प्रदूषण कमी करण्यासाठी महापालिकेच्या वतीने नाल्यांमध्ये जाणारे पाणी अडवून ते वळविले जात आहे. त्यामुळे ...

नाशिक : गोदावरी आणि उपनद्यांचे प्रदूषण कमी करण्यासाठी महापालिकेच्या वतीने नाल्यांमध्ये जाणारे पाणी अडवून ते वळविले जात आहे. त्यामुळे आनंदवली परिसरातील नाल्यांमधून नदीपात्राचे होणारे प्रदूषण थांबवण्यात आले आहे. त्याचप्रमाणे तपोवन मलनिस्सारण केंद्रातून बाहेर पडणाऱ्या पाण्यावर ओझोनायझेशनची प्रक्रिया केली जात आहे. या प्रयोगामुळे गोदावरी नदितील फेसाळलेले पाणी कमी होणयास मदत हेाईल, असे मत गोदावरी शुद्धीकरणासाठी गठीत उपसमितीच्या बैठकीत व्यक्त करण्यात आले.

गोदावरी शुद्धीकरणासाठी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार विभागीय आयुक्तांच्य अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समिती गठित करण्यात आली असून, या समितीची उपसमिती असलेल्या महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व अन्य समिती सदस्यांची बैठक नुकतीच पार पडली यावेळी याबाबत माहिती देण्यात आली. औद्योगिक प्रदूषणाविषयी बैठकीत नेहमीच चर्चा होते. मात्र औद्योगिक क्षेत्रात गटारी आणि मलनिस्सारण प्रकल्प केंद्रांची जबाबदारी उच्च न्यायालयाने प्रदूषण मंडळाकडे दिली असताना मंडळ आणि महापालिका यांच्यात जबाबदारी एकमेकांवर ढकलण्याचे प्रकार सुरू असल्याचा आरोप यावेळी याचिकाकर्ते राजेश पंडित यांनी केला.

नाल्यांच्या माध्यमातून गोदावरी नदीत होणारे प्रदूषण यावर चर्चा करताना गंगापूररोड परिसरातून जाणारे नाल्यांचे पाणी मलवाहिकेतून गंगापूर मलनिस्सारण केंद्राकडे वळविण्यात आले आहे. १८ एमएलडी क्षमता असलेल्या केंद्रामुळे बारदान फाटा नाला आणि सोमेश्वर नाला कोरडा पडलेला आहे. कारण या नाल्यातील सांडपाणी गटार व्यवस्थेला जोडण्यात आले आहे. आनंदवल्ली बंधाऱ्यातही येऊन मिसळणारा नाला, चिखली नाला, आसाराम बापू पुलालगतच्या नाल्यातून होणारे प्रदूषण थांबल्याची यावेळी माहिती देण्यात आली.

चोपडा नाल्यातून गटारीचे पाणी पात्रात मिसळत असल्याच्या तक्रारी यापूर्वी करण्यात आल्या होत्या. मात्र या भागातील मलजल पाणी गटारीत वळविण्याचे काम ७० टक्के पूर्ण झाले आहे. लेंडी नाल्यातून पात्रात सांडपाणी मिसळू नये म्हणून महापालिकेने स्मार्ट सिटी योजनेंतर्गत काम हाती घेतले आहे. हे काम ४० टक्के पूर्ण झाल्याची माहिती या बैठकीत महापालिकेच्या वतीने देण्यात आली. इन्फो... तपोवन येथे ओझोनायझेशन प्रक्रिया नेरीच्या नव्या निकषानुसार सर्व मलनिससारण प्रक्रिया केंद्रांमधून बाहेर पडणाऱ्या प्रक्रियायुक्त मलजलाचा बीओडी दहापेक्षा कमी करावा लागणार आहे. हे खूप खर्चिक काम असल्याने सध्या तपोवन मलनिस्सारण केंद्रात ओझोनायझेशनची प्रक्रिया करण्याचा अनोखा प्रयोग राबविण्यात येणार आहे. त्याची चाचपणी सुरू असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.