शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
2
LOCजवळ भूसुरुंग स्फोट, अग्निवीराला वीरमरण, २ जवान जखमी, पहलगाम हल्ला करणाऱ्या संघटनेने स्वीकारली जबाबदारी 
3
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
4
चालत गेली अन् शाळेच्या चौथ्या मजल्यावरून मारली उडी; दहावीतील विद्यार्थिनीचा व्हिडीओ आला समोर
5
गिलनं ज्याला वेटिंगवर ठेवलं तोच कामी आला! ओली पोप पाठोपाठ ब्रूकही वॉशिंग्टनच्या 'सुंदर' चेंडूवर फसला
6
दोन रुग्णवाहिका घेऊन सासरी पोहोचला जावई, २०-२५ जण उतरले, मारहाण, तुफान राडा, कारण काय?
7
Mhada Lottery 2025: म्हाडाच्या लॉटरीत लागलेले घर भाड्याने देऊ शकतो का? जाणून घ्या नियम!
8
Sarzameen Movie Review: देशभक्तीच्या पार्श्वभूमीवरील पिता-पुत्राची भावनिक कथा 'सरजमीं'
9
"नरेंद्र मोदी मोठी समस्या नाहीत, त्यांच्यात ..."; विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचा मोठा हल्ला!
10
मुंबई लोकलमध्ये ६२ कोटी रुपयांचे मोबाईल चोरीला; किती लोकांना परत मिळाले? 
11
चीनचा Bajaj ला मोठा धक्का; ऑगस्टपासून बंद होऊ शकते EV चे उत्पादन, कारण काय..?
12
‘५६ लाख घुसखोर आले कसे? तुम्ही राजीनामाच द्या’, महुआ मोईत्रांनी अमित शाहांना सुनावले  
13
Bank Job 2025: बँक ऑफ बडोदामध्ये मॅनेजर, सिनियर मॅनेजर पदांसाठी भरती; संधी सोडू नका!
14
'एक नंबर'! 'लोकमत डॉट कॉम'सोबत वाचकांची 'महायुती'; ६,२१,५३,००० 'लोकमतां'सह घेतली 'महाआघाडी'
15
फहाद फासिलनं सांगितले त्याचे आवडते '५' चित्रपट, तुम्ही पाहिलेत का?
16
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार; मंत्रि‍पदाच्या चर्चांवर राहुल नार्वेकरांचे सूचक विधान
17
एक दोन नाही तर २५००० कर्मचाऱ्यांची कपात होणार, एप्रिलनंतर आता पुन्हा एकदा Intel च्या कर्मचाऱ्यांवर संकट
18
"...हे विरोधी पक्ष ठरवू शकत नाही"; लोकसभेत प्रचंड गोंधळ, कोणत्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री भडकले?
19
'माझ्या मनावर ओझं पण...' ९००० कर्मचाऱ्यांना काढल्यानंतर सत्या नाडेला यांनी अखेर मौन सोडले; म्हणाले...
20
सरकार आता आमची गेलेली मुलं परत आणून देऊ शकतं का? शाळा दुर्घटनेनंतर पालकांचा आक्रोश

बिबटे वाढले; पिंजरे कमी !

By admin | Updated: April 7, 2017 01:43 IST

बागायती तालुका म्हणून नावलौकिक असलेल्या जिल्ह्यातील निफाडमधील गोदाकाठावर मानव-बिबट्याचा संघर्ष अद्यापही ‘जैसे थे’ असून, दिवसेंदिवस हा संघर्ष अधिक गंभीर बनला आहे

 बागायती तालुका म्हणून नावलौकिक असलेल्या जिल्ह्यातील निफाडमधील गोदाकाठावर मानव-बिबट्याचा संघर्ष अद्यापही ‘जैसे थे’ असून, दिवसेंदिवस हा संघर्ष अधिक गंभीर बनला आहे. दोन दिवसांपूर्वीच तारुखेडले शिवारात एका पाचवर्षीय गुड्डी हांडगे या बालिकेचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याने हा संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. निफाड तालुक्यात उसाबरोबरच मका, गव्हाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. शंभर ते हजारो हेक्टरवर असलेल्या शेतीमुळे बिबट्यांना जणू कृत्रिम जंगलच मिळाले आहे. याबरोबरच परिसरात रानडुक्कर, कोल्ह्यांची संख्यादेखील जास्त असल्यामुळे बिबट्यांना सुरक्षित अधिवास व मुबलक अन्न-पाणी मिळत असल्याने बिबट्यांचा वावर वाढला आहे. चेहडी खुर्दपासून सायखेडा, गोदानगर तर थेट नांदूरमधमेश्वरपर्यंत संपूर्ण गोदाकाठावर बिबट्याच्या दहशतीची छाया अधिक गडद झाली आहे. उसाच्या वाढत्या उत्पादनाबरोबरच बिबट्याची संख्यादेखील या भागात वाढू लागली आहे.प्रजननासाठी अत्यंत पोषक असे वातावरण व अधिवास उपलब्ध असल्यामुळे बिबटे या भागात सक्रिय झाले आहेत. कोल्हे, रानडुक्कर, गाय, बैल, वासरू, शेळ्या यांसारख्या जनावरांसह बिबट्यांकडून मानवालाही लक्ष्य केले जात असल्याने अवघा गोदाकाठ थरारला आहे. एकूणच वाढता मानव-बिबट्याचा संघर्ष कमी करण्यासाठी वनखात्याकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहे; मात्र अपुरे पिंजरे आणि मनुष्यबळामुळे वनखात्याचे प्रयत्न तोकडे पडत असल्याचे दिसत आहेत. बिबट्याचे वाढते हल्ले आणि दुर्दैवी घटना घडल्यानंतर आपत्कालीन परिस्थितीत येवला किंवा मनमाड येथून अंतर कापून निफाडच्या गोदाकाठावर पोहचणाऱ्या वनअधिकारी, कर्मचाऱ्यांना अनेकदा नागरिकांच्या रोषाचा सामनाही करावा लागतो. निफाडच्या गोदाकाठावरून सातत्याने स्वतंत्र वनविभागाचे उपकार्यालय निफाडला स्थापन करावे व पुरेसे मनुष्यबळ व रेस्क्यू पथक पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करावे, अशी मागणी जोर धरत आहे, मात्र त्यांच्या मागणीला अद्याप यश आलेले नाही. यामुळे नागरिकांमध्ये नाराजीही दिसून येणे साहजिक आहे. पिंजऱ्यांची संख्यादेखील अल्प असून, निफाड परिसरात बिबट्यांचा वावर वाढत असल्यामुळे पिंजरेही या भागात वनविभागाने सज्ज ठेवणे गरजेचे असल्याचे संतप्त नागरिकांचे म्हणणे आहे. येवला वनपरिक्षेत्रामधील सहा ते सात कर्मचाऱ्यांवरच मनमाड व निफाड तालुक्याची दारोमदार नाशिक वनविभागाकडून (पूर्व) सोपविण्यात आली आहे. यामुळे कर्मचाऱ्यांची आपत्कालीन परिस्थितीत घटनास्थळी पोहचताना त्रेधातिरपिट उडते. रेस्क्यू पथकाची स्वतंत्र रचना करून ‘निफाड फॉरेस्ट रेस्क्यू टीम’चे अस्तित्व निर्माण करण्याची गरज आता वाढल्याचे पंचक्रोशीच्या सरपंच व गावकऱ्यांचे म्हणणे आहे. सध्या वनविभागाकडून येवला वनपरिक्षेत्राच्या कर्मचाऱ्यांवरच ‘रेस्क्यू’ची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त ताण निर्माण होत असून, कर्मचारी निफाड भागात असले तर येवला, ममदापूर, विसापूर, अंकाई, राजापूर या भागाची पंचाईत होते. या भागातही शेड्यूल एकमध्ये संरक्षित बिबट्या व काळवीट या वन्यजीवांचे वास्तव्य अधिक आहे. त्यांच्या संवर्धन व संरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर येतो. निफाडचा गोदाकाठ परिसर यापूर्वी नाशिक वनविभाग पश्चिमच्या अखत्यारित होता; मात्र सहा महिन्यांपूर्वीच हा संपूर्ण परिसर नव्याने वनविभाग पूर्वकडे हस्तांतरित करण्यात आला आहे.