कळवण : शेतकरी सहकारी संघाच्या सभापतीपदी संतोष मोरे तर उपसभापतीपदी प्रल्हाद शिवदे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. पदाधिकाऱ्यांची निवडणूक बिनविरोध करण्याची परंपरा यंदादेखील कायम राहिली आहे.सभापती राजेंद्र पवार, उपसभापती माणिक देवरे यांनी आवर्तन पद्धतीने राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या सभापती व उपसभापतीपदासाठी संचालक मंडळाची विशेष सभा घेण्यात येऊन निवडणूक बिनविरोध करण्यात आली. दोघेही पदाधिकारी आमदार डॉ. राहुल आहेर, भाजपा जिल्हाध्यक्ष केदार आहेर, भाजपा नेते सुधाकर पगार यांचे विश्वासू सहकारी आहेत. शेतकरी सहकारी संघामध्ये भाजपाचे वर्चस्व असून राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस पदाधिकारीदेखील संचालक मंडळात प्रतिनिधीत्व करीत आहेत. नवनिर्वाचित सभापती मोरे, उपसभापती शिवदे यांचा सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी यावेळी सत्कार केला.निवडीप्रसंगी भाजपा नेते सुधाकर पगार, निंबा पगार, राजेंद्र पवार, माणिक देवरे, महेंद्र हिरे, जिभाऊ वाघ, सोमनाथ पवार, जितेंद्र पगार, संगीता देवरे, मीनाक्षी पगार, बुधा जाधव आदी उपस्थित होते.
कळवणच्या शेतकरी संघाच्या सभापतीपदी संतोष मोरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 18:21 IST
कळवण : शेतकरी सहकारी संघाच्या सभापतीपदी संतोष मोरे तर उपसभापतीपदी प्रल्हाद शिवदे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. पदाधिकाऱ्यांची निवडणूक बिनविरोध करण्याची परंपरा यंदादेखील कायम राहिली आहे.
कळवणच्या शेतकरी संघाच्या सभापतीपदी संतोष मोरे
ठळक मुद्देबिनविरोध : उपसभापतीपदी प्रल्हाद शिवदे