शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
5
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
6
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
7
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
8
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
9
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
10
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
11
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
12
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
13
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
14
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
15
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
16
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
17
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
18
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
19
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
20
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागात सेटटॉप बॉक्स बसविण्याची धावपळ

By admin | Updated: April 2, 2017 01:05 IST

नाशिक : जिल्ह्णातील १५१३४ केबलधारकांचे प्रक्षेपण खंडित करण्यात आल्याने ग्रामीण भागात सेटटॉप बॉक्स बसविण्यासाठी धावपळ सुरू झाली आहे.

 नाशिक : उपग्रहाद्वारे प्रक्षेपित होणारे खासगी दूरचित्रवाहिन्यांचे मनोरंजनाचे कार्यक्रम प्रसारित करणाऱ्या यंत्रणेचे संपूर्ण डिजिटाइझेशन करण्याच्या केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनेच्या अखेरच्या चौथ्या टप्प्याची मुदत ३१ मार्चअखेर संपुष्टात आल्याने जिल्ह्णातील १५१३४ केबलधारकांचे प्रक्षेपण खंडित करण्यात आल्याने ग्रामीण भागात सेटटॉप बॉक्स बसविण्यासाठी धावपळ सुरू झाली आहे. केंद्र सरकारने सन २०१२ मध्ये केबल प्रक्षेपणाचे संपूर्ण डिजिटायझेशन करण्याचा निर्णय घेतला, त्यामागे ग्राहकांना अधिकाधिक मनोरंजनाच्या कार्यक्रमांचा आस्वाद घेता यावा त्याचबरोबर करमणूक कराची चोरी रोखता यावी हा हेतू असल्याने पहिल्या टप्प्यात देशातील ९२ महानगरांमध्ये त्याची अंमलबजावणी करण्यात आली व सेटटॉप बॉक्स बसविल्याशिवाय कार्यक्रम दूरचित्रवाणीवर दिसू शकणार नाही, अशा तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात आला. त्यानंतर मात्र टप्पाटप्प्याने संपूर्ण देशात डिजिटायझेशन करण्यात आले. या योजनेचा अखेरचा टप्पा डिसेंबर २०१६ मध्येच संपुष्टात येणार होता. तथापि, शासनाने ग्रामीण भागात सेटटॉप बॉक्स बदलून देण्यासाठी नागरिकांना तीन महिन्यांची मुदत वाढवून दिली. त्यानुसार ३१ मार्च अखेरची मुदत होती. चौथ्या टप्प्यात महापालिका, नगरपालिका, नगरपंचायती वगळता ग्रामपंचायत पातळीवरील गावांमध्ये सेटटॉप बॉक्स बसविण्याचा समावेश होता. शासनाने वेळोवेळी आवाहन करूनही जिल्ह्णातील १५१३४ नागरिकांनी सेटटॉप बॉक्स न बसविल्याने शुक्रवारी रात्री बारा वाजेनंतर त्यांचे प्रक्षेपण बंद करण्यात आले. यासाठी जिल्हा प्रशासनाने डेन, हाथवे, इंड्स या तीन प्रमुख कंपन्यांच्या एमएसओंना पत्र देऊन प्रक्षेपण बंद करण्याबाबत तीन दिवसांत अहवालही मागविला आहे. ग्रामीण भागात केबलद्वारे प्रक्षेपित होणारे कार्यक्रम सेटटॉप बॉक्स न बसविल्याने बंद झाल्यामुळे आता सेटटॉप बॉक्स बसविण्यासाठी धावपळ सुरू झाली आहे. यासाठी काहींनी थेट डीटीएच सेवा घेण्याचा तर काही गावांमध्ये कंपन्यांनीच पुढाकार घेत सेटटॉप बॉक्स उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली आहे. ग्रामीण भागात दरमहा पंधरा रुपये करमणूक कर असल्यामुळे कंपन्यांनी सवलतीच्या दरात सेटटॉप बॉक्सची योजना सुरू केली आहे. (प्रतिनिधी)