लोकमत न्यूज नेटवर्ककनाशी : कळवण तालुक्यातील कनाशी येथे ठक्कर बाप्पा योजनेंतर्गत दहा लाख रुपये खर्च करून जिल्हा परिषदेतर्फे गेल्या दोन वर्षांपासून अंतर्गत रस्ते बनविण्याची कामे सुरू आहेत. दारांसमोर खडीचे ढीग अनेक दिवसांपासून पडून असल्याने व अगदी धिम्या गतीने काम होत असल्याने ग्रामस्थांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. जिल्हा परिषदेकडून ठक्कर बाप्पा योजनेंतर्गत गावातील रस्ते खडीकरणासह डांबरीकरण करण्यात येत आहेत. गावात खडी टाकण्यात आलेली आहे. ग्रामस्थांच्या वारंवार तक्रारींनंतर काही रस्त्यांच्या खडीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले. मात्र डांबरीकरणाच्या कामाला सदर ठेकेदाराने पूर्णविराम दिल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ग्रामस्थांच्या घरांसमोर खडीचे ढीग अनेक दिवसांपासून पडून असून, ग्रमास्थांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. घरासमोर खडीचे ढीग पडून असल्याने पावसाळ्यात घरात पाणी शिरण्याची भीती ग्रामस्थांमधून व्यस्त केली जात आहे. सदर काम पावसाच्या आधी पूर्ण करण्याबाबत ठेकेदारास वारंवार विनंती करून तो याकडे कामाकडे दुर्लक्ष करत आहे. गाव अंतर्गत रस्ते वाहनधारकांसाठी मृत्यूचा सापळा बनला आहे. या अर्धवट खडीकरण झालेल्या रस्त्यांवरून प्रवास करणे अवघड झाले आहे. सदर कामाला सुरुवात होऊन दोन वर्षे झाली मात्र जिल्हा परिषदचे अधिकारी व लोकप्रतिनिधी या कामाकडे दुर्लक्ष करीत आहे. धिम्या गदीने होत असलेल्या कामाबद्दल ग्रामस्थांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. डांबरीकरणाचे काम लवकर सुरू करून पूर्ण करावे, अशी मागणी अशोक बोरसे, राकेश गोविंद, केदा वाघ, गंगाधर पवार, अशोक वाघ, सोहन महाजन, गोविंद वाघ, ज्ञानेश्वर वाघ, नारायण वाघ, बापू वाघ, भावडू भालेराव, आप्पा भालेराव, बापू जाधव, श्यामकांत जाधव, गोरख बोरसे, संजय बागुल आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
दोन वर्षांपासून सुरू आहेत रस्त्यांची कामे !
By admin | Updated: June 10, 2017 00:20 IST