मनोज देवरे कळवणकळवण तालुक्यात रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय आणि बिकट झाली असून, रस्त्यावरील पाण्याचा निचरा होत नाही. निचरा होण्यासाठी गटारी नाहीत. रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडले असून, रस्ते खचून गेल्याने चढउताराचे रस्ते तयार झाले आहेत. त्यामुळे आता तालुक्यातील संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनाच दुचाकीवरून तालुक्यातील वाडी, पाडे, गाव, वस्ती, नगरे यांच्या रस्त्यावरून फिरवायला हवे अशी म्हणण्याची वेळ आली आहे, असेही जयश्री पवार यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे.ए. टी. पवार यांची संकल्पना आदिवासी, सर्वसामान्य शेतकरी व जनतेच्या विकासासाठी गावोगावी, खेड्यापाड्यांत वाडीवस्ती, शिवारपांधीपर्यंत रस्ते असणे गरजेचे आहे. रस्ते आणि रस्त्यारस्त्यांनी गावे जोडली गेल्यानंतर माणसे माणसांनी जोडली जातील, समाजाच्या मुख्य प्रवाहात येतील हे लक्षात घेऊन माजी मंत्री ए. टी. पवार यांनी गाव तेथे रस्ता ही संकल्पना कळवण तालुक्यात साकारली. त्यामुळे रस्त्यांची सुधारणा, दुरु स्ती, खडीकरण व डांबरीकरण या कामांना प्राधान्य दिले गेल्याने गाव, वाड्या, वस्ती, पाडे, नगरे, शिवारपांधी यांना रस्त्यांनी जोडण्याचे महत्त्वाचे काम केले. कळवण तालुक्यात शेकडो किलोमीटर रस्त्यांची तसेच घाट कटिंग, नदी- नाल्यावर पूल, फरशीपूल आदि कामे शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून करून रस्त्यांचे रूप बदलविण्याचे सारे श्रेय माजी मंत्री ए. टी. पवार तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद व पंचायत समितीला जाते.घाटातही दरड कोसळते...आदिवासी व दुर्गम भागातील महाल, जांभाळ, उंबरदे, शिरसा, पायरपाडा आदि आदिवासी गावे रस्त्यांनी जोडली गेल्याने आज संपूर्ण तालुका रस्त्यांनी जोडला गेला आहे. त्यामुळे आदिवासी, सर्वसामान्य व शेतकरी समाजाच्या मुख्य प्रवाहात आले आहेत हे सत्य नाकारून चालणार नाही. सप्तशृंगगड ते नांदुरी हा रस्ता घाटकटिंग करून झाल्यानंतर तालुक्यात घाटकटिंग करून अनेक रस्ते झाल्याने अनेक गावे जोडली गेली. त्या घाटातदेखील दरडी कोसळल्याने रस्ते आज बंद झाले. घाटकटिंग रस्त्यांचे मातीकाम झाले मात्र खडीकरण व डांबरीकरण, मोरी कामे अजूनही न झाल्याने खडतर प्रवास आजही आदिवासी जनतेच्या नशिबात आहे. कळवण तालुक्यात गिरणा, पुनंद, बेहडी, तांबडी, धनोली आदि नद्यांवर तसेच ठिकठिकाणी नाल्यांवर रस्ता पुलांची उभारणी करून गावे रस्त्यांनी जोडली गेली. जनतेचा वेळ व पैसा वाचला, शिवाय त्यामुळे गावांचा विकास झाला, रूपदेखील बदलून गेले आहे. मात्र महाड येथील दुर्घटनेनंतर कळवण तालुक्यातील नदी-नाल्यांवरील किती पूल सुरक्षित आहेत याची तपासणी करण्याची तसदी सार्वजनिक बांधकाम विभागाने घ्यावी. कोल्हापूर फाटा ते अभोणादरम्यान असलेल्या फरशीपुलाची पाहणी संबंधित विभागाने केली तर अवस्था काय झाली आहे हे दिसून येईल. नांदुरी ते सप्तशृंगीगड घाट रस्तादेखील खचला आहे. येथील गिरणा नदीवरील पुलावरून येणेजाणे धोकादायक ठरू पाहत आहे, अशी तक्र ार नागरिकांनी केली आहे. त्याची दखल घ्यायला संबंधित अधिकारी व विभागाला वेळ मिळत नाही का, असा सवाल आदिवासी जनतेने केला आहे.
रस्ते झाले उद्ध्वस्त
By admin | Updated: August 14, 2016 22:50 IST