शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
3
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
4
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
5
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
6
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
7
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
8
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
9
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
10
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
11
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
12
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
13
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
14
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
15
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
16
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
17
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
18
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
19
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
20
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...

पाषाण शाळांबाबत प्रशासनाचा अहवाल फेटाळला

By admin | Updated: January 15, 2017 00:59 IST

उच्च न्यायालय : राज्य प्रकल्प संचालकांच्या पत्राला स्थगिती

नाशिक : महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे राज्य प्रकल्प संचालकांनी पाषाण शाळांबाबत शासनाला अहवाल सादर करून संबंधित शाळांना विशेष प्रवर्गांतर्गत अनुदानित मान्यता देण्यास दिलेल्या नकाराच्या पत्राला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे शिक्षण विभागाविरोधात सुरू केलेल्या लढ्यात पाषाण शाळांना या दगडखाणीतील कामगारांच्या मुलांसाठी पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, नाशिक, अहमदनगर, बीड, परभणी, लातूर, उस्मानाबाद, हिंगोली, सोलापूर, जळगाव, धुळे आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये पाषाण शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. या पाषाण शाळांतील विद्यार्थ्यांना शिक्षण हक्क कायद्यातील तरतुदींप्रमाणे विशेष बाबींंतर्गत अनुदानित मान्यता द्यावी व शासन स्तरावर सर्व शालेय योजनांचा लाभ मिळावा यासाठी ‘संतुलन’ संस्थेने शासनाकडे मागणी केली. या मागणीचा विचार करून तत्कालीन सरकाने २ डिसेंबर २०१२ रोजी या प्रकरणी अभ्यास समिती गठीत करून पर्याय मागवले होते. या समितीने २१ ते २४ आॅक्टोबर २०१३ या कालावधीत एकूण २२ पैकी २० शाळांना भेटी दिल्या. परंतु, या समितीची एकही बैठक तथा सहमती न घेता महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे राज्य प्रकल्प संचालक नंदकुमार यांनी अहवाल तयार करून शासनाला सादर केला. तसेच २३ आॅगस्ट २०१६ रोजी पाषाण शाळांना मान्यता देता येत नसल्याचे संस्थेला पत्र दिले. याबाबत समितीच्या सर्व सदस्यांनी अहवालाचा निषेध नोंदवत शासनाने या प्रकरणी बैठक घेण्याची मागणी केली, परंतु शासनाकडून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने अखेर संस्थेने शासन निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत याप्रकरणी याचिका दाखल केली. या याचिकेवरील सुनावणीत पाषाण शाळांना प्रशासनाने तयार केलेल्या अहवालाच्या आधारे दिलेल्या पत्राला स्थगिती पाषाण शाळेतील विद्यार्थ्यांना न्याय दिल्याचे ‘संतुलन’ संस्थेतर्फे सांगण्यात आले आहे. (प्रतिनिधी)