शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

रावणाचे दहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2017 01:06 IST

विजयादशमीच्या मुहूर्तावर असत्यावर सत्याचा विजय म्हणून शहरात विविध सार्वजनिक मंडळांच्या व संस्थांच्या वतीने रावणदहन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, नागरिकांची रावणदहन कार्यक्रमाला गर्दी लोटली होती. शहरातील गोदाकाठ, गंगापूररोडवरील माणिकनगर, गांधीनगर, राजीवनगर आदी ठिकाणी रावणाच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.

नाशिक : विजयादशमीच्या मुहूर्तावर असत्यावर सत्याचा विजय म्हणून शहरात विविध सार्वजनिक मंडळांच्या व संस्थांच्या वतीने रावणदहन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, नागरिकांची रावणदहन कार्यक्रमाला गर्दी लोटली होती. शहरातील गोदाकाठ, गंगापूररोडवरील माणिकनगर, गांधीनगर, राजीवनगर आदी ठिकाणी रावणाच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. गंगापूररोड परिसरात माणकिनगरमधील शिवसत्य मैदानावर तुळजाभवानी मंदिर ट्रस्टच्या वतीने नवरात्रोत्सव आयोजित करण्यात आला होता. या उत्सवाची सांगता विजयादशमीच्या मुहूर्तावर सुमारे ५० फुटी रावणाचा पुतळा दहणाने करण्यात आली . दशमुखी रावणाच्या पुतळ्यावर आकर्षक रोषणाई करण्यात आली होती . उपस्थित शेकडो नागरिकांनी रावणदहनापूर्वी रावणासोबत सेल्फी क्लिक केली. दरम्यान, पोलीस आयुक्त डॉ.रवींद्रकुमार सिंगल यांनी सपत्नीक देवीची पूजा केली. पूजेनंतर रावणाच्या प्रतीकात्मक पुतळा त्यांच्या हस्ते दहन करण्यात आला. यावेळी आमदार सीमा हिरे, नगरसेवक योगेश हिरे, महेश हिरे आदी मान्यवर उपस्थित होते.  यावेळी प्रभू रामचंद्र की जय, बोल दुर्गा माते की जय अशा घोषणांनी मैदान दुमदुमले होते. नाशिकच्या ढोल पथकाने आपल्या खास शैलीत ढोलवादन करत वातावरणात रंग भरला. साडेआठ वाजेच्या सुमारास रावणाचे दहन करण्यात आले. रावण दहनादरम्यान फटाक्यांची जोरदार आतषबाजी करण्यात येत होती. एकापेक्षा एक रंगीत शोभेचे फटाके फोडण्यात येत असल्यामुळे आसमंत उजळून निघाला होता.उपनगरला साठफुटी रावणाचे दहनगांधीनगर येथे नवरात्रीनिमित्त आयोजित रामलीला नाटिकेचा समारोप हजारो नागरिकांच्या उपस्थितीत रावणदहनाने उत्साहात झाला. यावर्षीही जल्लोषपूर्ण वातावरणात हा उत्सव पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या उत्सवाची पत्राद्वारे प्रशंसा केल्याने यंदा क्लबचा उत्साह अधिक द्विगुणित झाला होता. विजयादशमी अर्थात दसºयाच्या मुहूर्तावर पारंपरिक पद्धतीने गांधीनगर येथील वेल्फेअर क्लबच्या मैदानावर रामलीला नाटिकेमध्ये शनिवारी (दि.३०) सायंकाळी सात वाजता सुमारे तासभर प्रभू रामचंद्र यांची वानरसेना व रावणाची राक्षस सेना यांच्यात घनघोर युद्धाचे दृश्य थेट मैदानावर सादर करण्यात आले.अखेर रामलीलेतील प्रभू रामचंद्रांच्या वानरसेनेचा विजय झाला. यावेळी मैदानावर उभारण्यात आलेल्या ६० फुटी रावणाच्या भव्यदिव्य प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. यावेळी करण्यात आलेल्या नेत्रदीपक फटाक्याच्या आतषबाजीने उपस्थितांच्या डोळ्याचे पारणे फेडले होते. सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार देवयानी फरांदे, उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे, सहाय्यक आयुक्त सचिन गोरे, नाशिकरोड कारागृह अधीक्षक राजकुमार साळी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाजीराव महाजन, मुद्रणालयाचे उपमहाप्रबंधक ए.के. सक्सेना, विजय वाघेले, मनोहर बोराडे, रामलीला समितीचे महासचिव कपिल शर्मा, नगरसेवक अनिल ताजनपुरे, राहुल दिवे, सुषमा पगारे, आशा तडवी, रवी पगारे, हरिष परदेशी, संजय लोळगे आदि मान्यवर उपस्थित होते.