शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

वेधकाळातही बांधता येईल भाऊरायाला राखी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 01:04 IST

नाशिक : येत्या सोमवार, दि. ७ आॅगस्ट रोजी भारतात खंडग्रास चंद्रग्रहण असून, त्याच दिवशी नारळीपौर्णिमा असल्याने ग्रहणाच्या वेधकाळात रक्षाबंधनाचा सण साजरा करता येईल किंवा नाही, याबाबत संभ्रमाची स्थिती आहे. परंतु, चंद्रग्रहणाचा रक्षाबंधनाला कोणताही अडसर नसून वेधकाळातही रात्री १० वाजेपर्यंत राख्या बांधता येणार असल्याचे दाते पंचांगकर्ते मोहनराव दाते यांनी स्पष्ट केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : येत्या सोमवार, दि. ७ आॅगस्ट रोजी भारतात खंडग्रास चंद्रग्रहण असून, त्याच दिवशी नारळीपौर्णिमा असल्याने ग्रहणाच्या वेधकाळात रक्षाबंधनाचा सण साजरा करता येईल किंवा नाही, याबाबत संभ्रमाची स्थिती आहे. परंतु, चंद्रग्रहणाचा रक्षाबंधनाला कोणताही अडसर नसून वेधकाळातही रात्री १० वाजेपर्यंत राख्या बांधता येणार असल्याचे दाते पंचांगकर्ते मोहनराव दाते यांनी स्पष्ट केले आहे. वेधकाळात रक्षाबंधनाबाबत अनेक गैरसमज असल्याने सण साजरा करण्याबाबत महिलांमध्ये संभ्रमावस्था आहे.सोमवार, दि. ७ रोजी भारतात खंडग्रास चंद्रग्रहण दिसणार आहे. सोमवारी सायंकाळी ६.५४ वाजता चंद्रोदय होणार असून, त्यावेळी चंद्रबिंब ९९.६ टक्के असेल. त्यानंतर रात्री १०.५२ वाजता खंडग्रास चंद्रग्रहणाचा स्पर्शकाळ सुरू होईल. ग्रहणाचा मध्यकाळ हा रात्री ११.५१ वाजता असून, त्यावेळी चंद्रबिंबाचा २४.६ टक्के भाग पृथ्वीच्या छायेत आलेला असेल. रात्री १२.४९ वाजता मोक्षकाळ आहे, त्यावेळी ग्रहण सुटेल.सोमवारी रात्री १०.५२ ते १२.४९ वाजेपर्यंत ग्रहण पर्वकाळ असल्याने आणि ग्रहण रात्रीच्या दुसºया प्रहरात असल्याने ३ प्रहर आधीच म्हणजे दुपारी १ वाजेपासून ग्रहण मोक्षापर्यंत वेधकाळ आहे. चंद्रग्रहण आणि नारळीपौर्णिमा तथा राखीपौर्णिमा एकाच दिवशी आल्याने वेधकाळात रक्षाबंधनाचा सण साजरा करावा किंवा नाही, याबाबत संभ्रमाची स्थिती आहे.परंतु, वेधकाळात रक्षाबंधन साजरा करण्यास कोणताही अडसर नसल्याचे पंचांगकर्त्यांनी स्पष्ट केले आहे. रात्री १० वाजेपर्यंत बहिणींना आपल्या लाडक्या भावाला राख्या बांधता येणार असल्याचे पंचांगकर्त्यांनी म्हटले आहे. रक्षाबंधन साजरा करताना पंचांग आणि मुहूर्तदेखील अनेकजण महत्त्वाचा मानतात. त्यामुळे पंचांगकर्त्यांनी सांगितल्यानुसार वेधकाळातही राखी बांधण्यास अडसर नाही.नऊ वर्षांनंतर श्रावण पौर्णिमेस चंद्रग्रहण सोमवार, दिनांक ७ आॅगस्ट रोजी चंद्रग्रहण आहे. रात्री १०.५२ ते १२.४९ ग्रहण पर्वकाळ असून, या ग्रहणाचा वेध दुपारी १ पासून आहे. त्यामुळे दुपारी १ वाजेपूर्वी घरातील सर्वांचे भोजन होईल, अशा पद्धतीने कुलधर्म कुलाचार निमित्ताचे पूजन करावे. सोमवारचा उपवास असल्यास दुपारी १ पूर्वी फलाहार करून वेधात सायंकाळी सोमवारची पूजा करून उपवास सोडीत आहे, असा संकल्प करून नुसते तीर्थ घेणे योग्य होईल. कारण वेधात भोजन निषेध आहे मात्र जलपान निषेध नाही. वेधकाळात रक्षाबंधन करता येत असल्याने रात्री १० पर्यंत राखी बांधता येईल. यापूर्वी ६ आॅगस्ट १९९० रोजी श्रावण पौर्णिमेस सोमवारी चंद्रग्रहण होते आणि त्यानंतर १६ आॅगस्ट २००८ रोजी शनिवारी श्रावण पौर्णिमेस चंद्रग्रहण आले होते.- मोहनराव दाते, दाते पंचांगकर्ते, सोलापूर